Latest Marathi News | Post Office Account Scheme : टपाल खात्यातील काही योजनांच्या व्याजदरात वाढ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India Post News

Post Office Account Scheme : टपाल खात्यातील काही योजनांच्या व्याजदरात वाढ!

नाशिक : केंद्रीय अर्थ मंत्रालयाने टपाल खात्याच्या काही योजनांमधील व्याजदरात थोडी वाढ केली आहे. बदलत्या व्याजदराचा गुंतवणूकदारांसह ज्येष्ठांनी घ्यावा, असे आवाहन अधिक्षक मोहन अहिरराव यांनी केले आहे. (Post Office Account Scheme Increase in interest rate of some schemes in postal account Nashik Latest Marathi News)

केंद्रीय अर्थमंत्रालयातर्फे दर तीन महिन्यांनी राष्ट्रीयकृत बँकांसह टपाल खात्यातील व्याजदराचा आढावा घेऊन त्यात बदल केला जातो. त्यानुसार दोन वर्षीय, तीन वर्षीय मुदत ठेव (टाइम डिपॉझिट), मासिक प्राप्ती योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस) व किसान विकास पत्र (केव्हीपी) यांच्या व्याजदरात पुढील तिमाहीसाठी व्याजदरात १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीसाठी किंचित व्याजदर वाढ केली केली.

ज्येष्ठांसह अन्य गुंतवणूकदारांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन खात्यातर्फे करण्यात आले आहे. यात एक वर्षांच्या व पाच वर्षीय मुदत ठेवीत कोणतेही व्याजदर वाढलेले नाहीत. मात्र, दोन व तीनवर्षीय मुदत ठेवीसाठी व्याजदरात वाढ केली आहे. याशिवाय, किसान विकास पत्र, मासिक प्राप्ती योजना, सिनिअर सिटिझन्स या योजनांच्या व्याजदरातही किंचित वाढ केली आहे.

टपालाच्या काही योजनांमधील व्याजदरात किंचित वाढ झालेली असली तरी खात्याच्या सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या रिकरिंग डिपॉझिट (आर.डी), एक वर्षीय, पाच वर्षीय मुदत ठेव, पीपीएफ, समृद्धी बचत योजना यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

हेही वाचा: Dhule Crime : शिरपूर- इंदूर बसमधून 5 पिस्तुले जप्त

क्रम योजनेचे नाव आधीचा व्याजदर सुधारित व्याजदर

१. दोन वर्षीय टाइम डिपॉझिट ५.५ टक्के ५.७ टक्के.

२. तीन वर्षीय टाइम डिपॉझिट ५.५ टक्के ५.८ टक्के

३. मासिक प्राप्ती योजना ६.६ टक्के ६.७ टक्के

४. सिनिअर सिटीझन्स योजना ७.४ टक्के ७.६ टक्के

५. किसान विकास पत्र ६.९ टक्के ७ टक्के

"टपाल खात्याच्या सर्वच योजना नागरिकांत कमालीच्या लोकप्रिय आहेत.गुंतवणुकदारांनी व अन्य ग्राहकांनी बदललेल्या वाढीव व्याजदरातचा लाभ घ्यावा."

- मोहन अहिरराव, अधिक्षक, टपाल कार्यालय

हेही वाचा: Chakra Puja : प्रतीकांच्या माध्यमातून निसर्गाशी एकरूपतेची पूजा

टॅग्स :Nashikpost officeschemes