NCCF Office
sakal
नाशिक: राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) यांनी २०२३-२४ मध्ये खरेदी केलेल्या कांद्याचे १० टक्के पैसे शेतकऱ्यांना अद्याप मिळालेले नाहीत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सव्वादोन कोटी रुपये या संस्थेकडे अडकले आहेत. त्याविरोधात रयत क्रांती संघटनेने गुरुवारी (ता. १६) ‘एनसीसीएफ’च्या अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडून घेतले. पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मध्यस्थीनंतर सोमवार (ता. २०)पर्यंत पैसे वर्ग करण्याचे आश्वासन देण्यात आले.