नाशिक- ‘ठाकरे बंधू एकत्र येणे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, त्यांचा पक्ष मोठा होईल की नाही, किंवा त्यांची धोरणं काय असतील याची चिंता आम्ही करण्याऐवजी आमचा पक्ष कसा मोठा होईल याकडेच आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत,’असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. त्यांनी या वेळी उद्धव ठाकरे यांच्या वरळी मेळाव्यावर थेट प्रतिक्रिया देणे टाळले.