
Nashik NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते नितीन मोहिते यांनी हजारो कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला नाशिकमध्ये मोठे भगदाड पडले आहे. (NCP Nitin Mohite join Vanchit Bahujan Aghadi with supporters nashik news)
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (ता. १२) मुंबई येथे नाशिक जिल्हाध्यक्ष पवन पवार, उत्तर महाराष्ट्र महासचिव वामन गायकवाड, महानगरप्रमुख अविनाश शिंदे, महानगर सचिव बजरंग शिंदें यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
नितीन मोहिते हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणून गणले जातात. देवळाली मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही लढवली होती. त्यांच्या व समर्थकांच्या प्रवेशाने वंचित बहुजन आघाडीला मोठे बळ मिळेल, असे महानगरप्रमुख अविनाश शिंदे यांनी नमूद केले. वंचित बहुजन आघाडी नाशिक महानगर तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बळकट होत आहे.
भाजपला पर्याय म्हणून अनेक जण वंचित बहुजन आघाडीकडे मोठ्या आशेने बघतात.
सामाजिक कार्यकर्ते शंकर जाधव, जलालपूर सरपंच अनिल जाधव, सामाजिक कार्यकर्ते अरुण काशीद, मराठा समाजाचे नेते तुकाराम मोजाड, आनंदा ढेरिंग, आदिवासी समाजाचे नेते किरण वायकांडे, शरद साळवे, धोंडिराम गलांडे, मुकेश रामराजे, अरुण रोकडे, सरपंच श्याम गारे, सूरज गांगुर्डे, सुनील साळवे, उत्तम साळवे, चांदसी ग्रामपंचायत माजी सरपंच शरद धोंगडे, सागर भालेराव, विलास जाधव, अमित जाधव, बाळासाहेब जाधव, भाऊराव साळवे, राहुल जाधव, बाळासाहेब पगारे, अखिलेश जाधव, सोमनाथ कराटे, जगन गुळवे, सीताराम धुमाळ, विजय गायकवाड, गौतम पगारे, संतोष बेंडकुळे, सोमनाथ दिवे, भाऊसाहेब दिवे, निखिल जाधव, आकाश जाधव, सुरेश जाधव, रामदास जाधव, सुरेश दोंदे आदींनी या वेळी प्रवेश केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.