NCP News : मध्य विधानसभा मतदारसंघ ‘राष्ट्रवादी’च्या केंद्रस्थानी!

ncp news
ncp newsesakal

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने लढविण्याची तयारी केली असतानाच याच मतदारसंघातून आमदार निवडून आणण्यासाठी नगरसेवकांची संख्यादेखील तेवढीच असणे गरजेचे आहे.

त्याअनुषंगाने मध्य विधानसभा मतदारसंघ केंद्रस्थानी ठेवत राष्ट्रवादीकडून अधिक अधिक नगरसेवक निवडून आणण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. (NCP ready fir Madhya Vidhan Sabha Constituency nashik news)

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपात मध्य विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडे आहे. २०१९ च्या निवडणुकीत ज्येष्ठ नेत्या डॉ. हेमलता पाटील यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढविली. डॉ. पाटील यांना पडलेल्या मतांचा विचार करता भाजपच्या विद्यमान आमदार प्रा. देवयानी फरांदे यांना त्यांनी दिलेली लढत लक्षनिय ठरली होती.

त्यामुळे मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपला पराभूत करणे सहज सोपे आहे, अशी भावना निर्माण झाली. मागील विधानसभा निवडणुकीत वसंत गिते यांनी निवडणूक लढविली नाही. काँग्रेसकडून गिते उमेदवार असते तर कदाचित मध्य विधानसभा मतदारसंघाचे चित्र वेगळे दिसले असते, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.

त्यामुळेच आता राष्ट्रवादीने या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करत मराठा उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. या मतदारसंघात दलित व मुस्लिम मतदारांची संख्या मतदान फिरविण्याइतकी आहे. मराठा व त्या खालोखाल इतर मागासवर्गीय मतदान अधिक आहे. या प्रमुख हेरून राष्ट्रवादीने तयारी सुरू केली आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

ncp news
Nashik News : पेठ रोडसाठी नगरविकास विभागाकडे धाव; पालकमंत्री भुसे, आमदार ढिकले संयुक्त मागणी करणार

विधानसभा आधी महापालिकेची तयारी

महापालिका निवडणुका अद्यापपर्यंत झालेल्या नाही विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता आहे. त्या अगोदर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मध्य विधानसभा मतदारसंघ जिंकायचे असेल तर याच मतदारसंघात राष्ट्रवादीचे नगरसेवकदेखील तेवढेच असायला हवे. २०१७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवक या भागातून निवडून आले होते.

आता हीच संख्या दहा ते बारा अशी असणे गरजेचे आहे. त्यामुळे द्वारकापासून पुढे उपनगरपर्यंत दोन, जुने नाशिक भागातून चार, वडाळा गाव भागातून दोन तर महात्मानगर, गंगापूर रोड, कॅनडा कॉर्नर या भागातून दोन नगरसेवक निवडून आणण्याचे नियोजन सुरू आहे.

ncp news
New Education Policy : नव्या शैक्षणिक धोरणात शिक्षकांची जबाबदारी वाढली; शिक्षणतज्ज्ञ जोशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com