
jayant patil
esakal
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे एकदिवसीय शिबिर आज नाशिकमध्ये आयोजित करण्यात आले होते. या शिबिराकडे पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांचे लक्ष लागले होते. मात्र, या शिबिराला माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अनुपस्थितीमुळे सुरुवातीला चर्चेचा विषय ठरला. उशिरा का होईना, जयंत पाटील शिबिरात दाखल झाले, पण त्यांच्या आगमनाने एक मजेदार गोंधळ उडाला. शिबिराच्या ठिकाणी पोहोचण्याऐवजी ते चुकून शेजारी सुरू असलेल्या हवनाच्या ठिकाणी गेले! चूक लक्षात येताच हसत-हसत त्यांनी माघारी वळत शिबिरात प्रवेश केला.