Nashik Loksabha News: लोकसभेच्या नाशिकच्या जागेवर ‘राष्ट्रवादी’चा आग्रह

Loksabha Election Mahavikas Aghadi ShivSena
Loksabha Election Mahavikas Aghadi ShivSenaesakal

Nashik Loksabha News : महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यात नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे नाशिकच्या जागेचा आग्रह धरला आहे. त्याचबरोबर शिवसेनेकडे देवळाली विधानसभेची जागा असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेससाठी जागेची मागणी करण्यात आल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

पुढील वर्षाच्या एप्रिल किंवा मेमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीसाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली असतानाच विरोधी पक्षांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. (ncp wants on Nashik Lok Sabha seat news )

त्या तयारीचाच एक भाग म्हणून महायुतीमध्ये नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाकडे असली, तरी भाजपने त्या जागेवर दावा करण्यास सुरवात केली. सर्वेक्षणात भाजपच्याच उमेदवाराला अधिक पसंती असल्याची आकडेवारी दाखविली जात आहे.

नाशिक लोकसभेवर शिंदे सेनेचा दावा असला, तरी धुळे लोकसभा मतदारसंघाची जागा शिंदे गटाला सोडून त्याऐवजी नाशिकची जागा भाजपला सोडण्याचे प्रयत्न होत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीतही नाशिकच्या जागेवरून अंतर्गत राजकारण रंगल्याचे दिसून येते. नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचा खासदार निवडून आला आहे.

महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यात शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व काँग्रेसचे आमदार किंवा खासदार ज्या जागेवर निवडून आले आहेत, त्या जागेवर प्रथम प्राधान्य त्याच पक्षाच्या उमेदवारांना राहणार आहे.

Loksabha Election Mahavikas Aghadi ShivSena
Loksabha Election : भाजप निंबाळकरांचं तिकीट कापणार? मोहिते-पाटलांच्या 'या' घोषणेमुळं राजकीय चर्चांना उधाण

त्यामुळे नाशिकची जागा शिवसेना ठाकरे गटाकडून लढविली जाणार असल्याचे तूर्त दिसून येते; परंतु दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडूनही नाशिकच्या जागेसाठी आग्रह धरला जात आहे. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडे काही दिवसांपूर्वी झालेल्या भेटीत नाशिकच्या जागेसंदर्भात आग्रही मागणी करण्यात आली.

देवळालीच्या जागेवरही आग्रह

देवळाली विधानसभेच्या जागेवर सध्या विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर अजित पवार गटात विद्यमान आमदार सहभागी झाल्या. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार देवळाली विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असली, तरी त्या जागेवर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडूनही मागणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससाठीच देवळालीच्या जागेचा आग्रह धरण्यात आला. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेससाठी शिवसेनेच्या एका माजी आमदाराची परेडही करण्यात आली.

Loksabha Election Mahavikas Aghadi ShivSena
Loksabha Election : महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्चित! लोकसभेच्या 'या' दोन्ही जागा ठाकरेंकडे, ही नावं चर्चेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com