NTA Entrance Exams : NEET ७ मेस, JEE Mains जानेवारी अन् एप्रिलमध्ये!

NTA Entrance Exams
NTA Entrance Examsesakal

नाशिक : नॅशनल टेस्टिंग एजन्‍सी (एनटीए) यांच्‍यातर्फे २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्‍या प्रवेश परीक्षांचे संभाव्‍य वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्‍यानुसार जेईई मेन्‍स परीक्षा जानेवारी आणि एप्रिल अशा दोन सत्रात घेतली जाणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट परीक्षा ७ मेस तर कॉमन युनिव्‍हर्सिटी एट्रन्‍स एक्‍झाम (सीयुईटी २०२३) परीक्षा मे अखेरीस घेतली जाणार आहे. (NEET 7th Mains JEE Mains in January and April NTA Entrance Exams nashik news)

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता विविध अभ्यासक्रमांना प्रवेश परीक्षेच्‍या माध्यमातून प्रवेश दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षांची तयारी करता यावी, या उद्देशाने एनटीए यांच्‍यातर्फे प्रवेश परीक्षांचे संभाव्‍य वेळापत्रक प्रसिद्ध केलेले आहे. राष्ट्रीय स्‍तरावरील इंडियन इन्‍स्‍टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) व अन्‍य संस्‍थांमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी जॉइंट एन्ट्रन्स एक्‍झाम (जेईई) मेन्‍स परीक्षा घेतली जाणार आहे.

२०२३ मध्ये विद्यार्थ्यांना जेईई मेन्‍ससाठी दोन सत्र उपलब्‍ध असतील. ऑनलाइन संगणकावर आधारित (कॉम्‍प्‍युटर बेस्‍स्‍ड टेस्‍ट) ही परीक्षा असणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी नॅशनल इलिजिब्‍लीटी कम एट्रन्‍स टेस्‍ट (नीट) परीक्षा ऑफ लाईन पद्धतीने पार पडत असते.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

NTA Entrance Exams
Indian Pensioner's Day : निवृत्तिधारकांना हवी प्रवासात सवलत अन् टोलमाफी

जेईई मेन्‍स अर्जाची १२ जानेवारीपर्यंत मुदत

जेईई मेन्‍स पहिल्‍या सत्रातील परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया सुरु झालेली आहे. इच्‍छुक व पात्र विद्यार्थ्यांना १२ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. याच मुदतीत निर्धारित परीक्षा शुल्‍क ऑनलाइन माध्यमातून भरायचे आहे. मराठी, इंग्रजी, हिंदीसह एकूण तेरा भाषांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे.

२०२३ साठी परीक्षांचे संभाव्‍य वेळापत्रक

*जेईई मेन्‍स (पहिले सत्र)----------२४ ते ३१ जानेवारी

*जेईई मेन्‍स (दुसरे सत्र)-----------६ ते १२ एप्रिल

*नीट-युजी----------------------------७ मे

*कॉमन युनिव्‍हर्सिटी एन्ट्रन्स टेस्‍ट (सीयुईटी)----२१ ते ३१ मे

*आयसीएआर एआयईईए---------------६ ते १२ एप्रिल

NTA Entrance Exams
NMC Tuberculosis survey : शहरातील 1200 रुग्णांना पोषण आहाराची गरज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com