new court building
sakal
नाशिक: समाजातील शेवटच्या घटकातील नागरिकाला कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळेत न्याय मिळाला पाहिजे, तरच या भव्यदिव्य न्यायालयीन वास्तूची सर्वार्थाने उपयुक्तता सिद्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त करीत सशक्त लोकशाहीसाठी सामाजिक आणि आर्थिक समानता महत्त्वाची असून, लोकशाहीचा एक स्तंभ म्हणून न्यायपालिकेवर मोठी जबाबदारी असल्याचे प्रतिपादन देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.