esakal | माळमाथ्याच्या मातीत ड्रॅगनफ्रुटचा गोडवा! दापुरेच्या तरुण शेतकऱ्याचा नवा यशस्वी प्रयोग
sakal

बोलून बातमी शोधा

dragon fruit

माळमाथ्याच्या मातीत ड्रॅगनफ्रुटचा गोडवा! नवा प्रयोग

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

(रिपोर्ट - हंसराज देसाई)

कळवाडी (जि.नाशिक) : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय बनला आहे. तरीसुद्धा अनेक शिक्षित तरुण या पारंपारीक व्यवसायात उतरून त्यात नवीन प्रयोग करत आहेत. असाच एक प्रयोग दापुरे (ता. मालेगाव) येथील नंदू सुर्यवंशी या तरूण शेतकऱ्याने आपल्या शेतात परदेशी ड्रॅगन फ्रूट लावुन केला आहे.

दापुरे येथील तरुण शेतकऱ्याचा नवीन प्रयोग

कापूस, ऊस या पारंपारीक पिकांऐवजी त्यांनी आपल्या वीस गुंठे शेतात निरपूर (ता. बागलाण) येथून ड्रॅगन फ्रुटची चारशे रोपे आणून लावली. माळमाथा भागातील हा पहिलाच प्रयोग आहे. सध्या हे पिक बहारावर आले असून, सुरवातीला कुटुंबासह मित्रमंडळींनी याची चव चाखली. यापुढे येणारा फळबहार ते मार्केटला पाठवणार आहेत. कमी पाण्यावर येऊन भरघोस पिक देणारे हे फळ आहे. त्यासाठी बारा बाय आठ फुटांवर पोल उभे करुन, एक फुट अंतरावर चार रोपे लावली असून, योग्य प्रमाणात पाणीपुरवठा, खते, स्लरी याचा उपयोग करत सुव्यवस्थित पिक व्यवस्थापन केल्यास चांगल्या प्रमाणात उतारा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या फळातून आरोग्यासाठी कॅल्शीयम, जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने तर मिळतातच; परंतु अन्नपचन, मधुमेह, कर्करोग, दमा, कोलेस्टेरॉल कमी करणे, मलेरिया, डेंग्यू आदी आजारांवर फायदा होतो. सोबतच जॅम, आईस्क्रीम, जेली, वाईन, फेसपॅक आदी उत्पादन व्यवसायातही याचा वापर होतो. त्यामुळे या फळाला बाजारात मोठी मागणी असून, बाजारभावसुद्धा चांगला मिळतो आहे. फळ तयार झाल्यानंतर बॉक्समध्ये पँकींग करुन मार्केटला नेता येते.

हेही वाचा: सणासुदीत गॅस सिलिंडर दरवाढीने अर्थकारण बिघडले

शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याची आवड असल्याने वेगळा प्रयोग म्हणून ड्रॅगनफ्रुटची लागवड केली. आता त्यात यश मिळत आहे. लवकरच मार्केटला फळे विक्रीसाठी जातील. एकाचवेळेला एकरी सहा लाखापर्यंत खर्च करुन दीर्घकाळ म्हणजे पुढील वीस वर्षे आपण उत्पन्न घेऊ शकतो. -नंदू सुर्यवंशी, प्रयोगशील शेतकरी, दापुरे

आपल्या तालुक्यात पारंपारिक शेतीबरोबरच नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन ड्रॅगनफ्रुटसारख्या परदेशी पिकाचे उत्पादन घेतले जात असून, आपल्या भागातील हवामान या पिकास अत्यंत पोषक आहे. सुरवातीला आपण यात आंतरपिकही घेऊ शकतो. -सोमसिंग पवार, कृषी अधिकारी, मालेगाव

हेही वाचा: जायकवाडी पाणी वापर; आकडेवारीची राजकीय गदारोळाला फोडणी

loading image
go to top