रावेर, (जि. जळगाव) - जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील केळी उत्पादन व निर्यात विक्रमाकडे वाटचाल करत आहे. राज्यातून सुमारे १४-१५ लाख टन केळी विदेशात निर्यात होत आहे. त्याच वेळी राज्यासह जिल्ह्यातील केळीवर फ्युजारियम विल्ट (पनामा) या बुरशीजन्य रोगाने शिरकाव केला आहे.