
Nashik : दुचाकी वाहनासाठी नविन मालिका सुरू
मालेगाव (जि. नाशिक) : येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे (Sub Regional Transport Office) दुचाकी वाहनांसाठी नविन मालिका ‘एमएच- ४१- बीजे’ सुरु करण्यात येत आहे. आकर्षक पसंती क्रमांक मिळण्याकरिता संबंधितांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी केले आहे. (New series for two wheelers launched Nashik News)
आकर्षक नोंदणी क्रमांकासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज २५ मेस सकाळी अकरा ते अडीच यावेळेत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संबंधित विभागात जमा करावेत. अर्जासोबत आधारकार्ड, विजबील, घरपट्टीची साक्षांकीत प्रत सादर करणे आवश्यक राहील. ज्या व्यक्तीच्या नावे वाहन खरेदी केले असेल त्याच व्यक्तीच्या नावाने अर्ज सादर करावा. अर्जासोबत फोटो ओळखपत्र, आधारकार्ड, निवडणुक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड इत्यादीची साक्षांकीत प्रत सादर करावी लागेल.
हेही वाचा: Crime Alert : खुनाच्या सत्राने हादरले नाशिक
पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या शुल्काची रक्कम, राष्ट्रीयकृत, शेड्युल्ड बँकेचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मालेगाव यांचे नांवे डिमांड ड्राफ्ट तसेच सोबत पॅनकार्डची साक्षांकीत प्रत जोडणे आवश्यक राहील. आकर्षक क्रमांकाचे शासकीय विहित शुल्काबाबतची माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, मालेगाव येथील नोटीस बोर्डवर देखील प्रदर्शित करण्यात आल्याचे श्री. जाधव यांनी कळविले आहे.
हेही वाचा: नाशिक : फुकट्यांकडून साडेबारा कोटींची वसुली
Web Title: New Series For Two Wheelers Launched Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..