
Nashik News : केरसाणे, दसाणे परिसरात रताळी लागवडीची लगबग!
नरकोळ (जि. नाशिक) : केरसाणेसह परिसरात नवीन रताळी (Sweet Potao) लागवड सुरू असून, गेल्या दहा वर्षांनंतर प्रथमच या पिकाचे क्षेत्र घटले आहे.
पुर्वी या पिकाचे उत्पादनात हे गाव अग्रेसर होते. (New sweet potato cultivation is underway in kerasane area of crop has decreased for first time after last ten years nashik news)
महाशिवरात्रीनंतर रताळी लागवड करण्यात येते. शेतमशागत करून नांगराने सरी पाडून शेत भिजवून रताळीचे वेल पाण्यात लावण्यात येते. उपवासाला चालणारा पदार्थ असल्याने श्रावण मासात रताळीला मागणी असते.
सहा ते सात महिन्यात येणारे व कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून रताळी ओळखली जातात. कोणत्याही प्रकारची फवारणी न करता येणारे पीक म्हणूनही याकडे पाहिले जाते. एक किंवा दोन वेळा निंदणी करताना वेलाची चाळणी करावी लागते.
ऐन पावसाळ्यात भरपूर पाणी मिळते. त्यामुळे याची जमिनीत चांगली वाढ होते. सप्टेंबर महिन्यात रताळी काढणीच्या वेळी वेल बेणे म्हणून लगेच लागवड करतात. तेच वेल महाशिवरात्रीनंतर लागवडीसाठी उपयोगी येतात.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
रताळीबाबत अजूनकाही
रताळ्याचे शास्त्रीय नाव (ईपोमोइयाबटाटाज) असे आहे. रताळ्याची पांढरी, लाल, जांभळी आणि तपकिरी साल देखील असते. रताळे नियमित खाल्ल्यास आपली रोगप्रतिकारक शक्ती अधिक बळकट होते. रताळे ही त्वचा ग्लो करण्यासाठी उपयोगी ठरते. तसेच, ते रक्तदाब नियंत्रित करण्यासाठीही मदत करते.
रताळ्यामध्ये व्हिटॅमिन बी-६ असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक असल्याचे सांगितले जाते. १०० ग्राम रताळ्यामध्ये जवळपास ९० ग्राम कॅलरिज असतात. रताळ्याच्या सेवणाने लठ्ठपणा नियंत्रित होतो. मधुमेह आणि हृदयाच्या आरोग्यासाठी रताळ्याचे सेवन खुपच लाभदायक असल्याचे सिद्ध झाले आहे.
"यंदा कांद्याला भाव मिळेल यांची शाश्वती नसल्यामुळे मी कांदा लागवड कमी करुन रताळी लागवड केली. गेल्या दहा वर्षांनंतर प्रथमच लागवड कमी होत आहे." -बाळू अहिरे, शेतकरी, केरसाणे, ता. बागलाण