Success Story : शेतकऱ्याची मुलगी नेहा करणार रौंदळ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Neha Sonawane in raundal marathi film

Success Story : शेतकऱ्याची मुलगी नेहा करणार रौंदळ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण!

कळवण (जि. नाशिक) : तालुक्यातील जुनीबेज गावातल्या सर्वसाधारण शेतकरी (Farmer) कुटुंबातील नेहा शशिकांत सोनवणे (Neha Sonawane) हिने गजानन पडोळ दिग्दर्शित रौंदळ या मराठी चित्रपटात

मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारून आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आहे. (Farmers daughter Neha will make her debut in film industry with film Raundal nashik news)

यामुळे ३ मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या रौंदळ चित्रपटाची कसमा परिसरातल्या प्रेक्षकांना ओढ लागली आहे. शेतकऱ्यावर आधारित असलेल्या मराठी चित्रपट रौंदळचे ट्रेलर नुकतेच रिलीज झाले आहे. येत्या ३ मार्चला हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'ख्वाडा' आणि संगीतप्रधान 'बबन' या रोमँटिक चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला भाऊसाहेब शिंदे आणि मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी, कळवण तालुक्यातील जुनीबेज गावातील नेहा सोनवणे 'रौंदळ' चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहेत.

सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि मराठी शाळेत बारावी पर्यंतचे शिक्षण घेऊन नाशिक येथे बी ई. काॅम्पुटरचे शिक्षण घेत असलेल्या नेहाला चित्रपट सृष्टीचा कुठल्याही प्रकारचा अनुभव नव्हता.

महाविद्यालयात शिक्षण घेता घेता कुठलाही अनुभव नसतांना जिद्द, चिकाटी आणि अस्सल शेतकरी असल्याने शेतीच्या कामातील ज्ञानाने अनुभवाने तीला रौंदळ या चित्रपटाची भूमिका मिळाली.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

पहिलाच चित्रपट असल्याने चित्रपटासाठी प्रचंड मेहनत नेहाने आणि सर्वच टिमने घेतली आहे. चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापूर, बारामती, नारायणगाव, पुणे या ठिकाणी करण्यात आले असून शुटिंग दरम्यान शेतीकामे, ऊसतोड, मोळी उचलण्याचा आदी. अनुभव घेतल्याचे नेहाने सांगितले. तसेच शेतकरयांसाठी असलेल्या चित्रपटात शेतकरयांची मुलगी म्हणून अभिनय करतांना प्रचंड समाधान वाटल्याचे नेहाने सांगितले.

"शेतकरी असल्याने चित्रपटात काम - शेतीची माहिती, शेतीकामाची अंशता सवयीमुळे मला चित्रपटात काम मिळाले. याशिवाय झाडावर चढणे सुध्दा ऑडीशनप्रसंगी काम मिळण्याचा रस्ता झाला. यामुळे शेतकरयांच्या मुलींनी शिक्षणासोबत शेतीतील अनुभव घ्यावा. व शेतकरी कुटुंबातील मुली कुठल्याही क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवू शकतात यावर विश्वास ठेवावा."- नेहा सोनवणे, मुख्य कलाकार, रौंदळ चित्रपट.

विविध पैलूंचे दर्शन

अहो, लयं अहंकार नका करू. सोन्याची लंका होती रावणाची...असा अर्थपूर्ण संवाद, आणि भलरी भलरी...., भरलं ढगानं आभाळं..अशा गाण्यांनी रिलिजनंतरच प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. खेड्यातील शेतकरयांवर होणारा अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारा नायक आणि त्याची प्रेमकहाणी, त्याचा संघर्ष, इतरांसाठी त्याचा लढा, कारखानदारी अशा विविध पैलूंचे दर्शन या चित्रपटात होणार आहे.

मजनू नंतर रौंदळमध्ये कळवणचा बोलबाला

कळवण तालुक्यात शुटिंग झालेल्या आणि मुळ कळवणची पण पनवेलला सध्या स्थायिक असलेल्या स्वेतलाना आहिरेने मुख्य भूमिका साकारलेल्या मजनू चित्रपटानंतर, रौंदळ या मराठी चित्रपटात नेहा सोनवणेच्या रूपाने मराठी चित्रपट सृष्टीत कळवणचा बोलबाला वाढत आहे. यामुळे आगामी काळातही चित्रपट सृष्टीची दृष्टी कळवणचे कलाकार वेधू शकतात