Nashik News : नववर्ष स्वागताचा अमाप उत्साह

New Year Celebration
New Year Celebrationesakal

जुने नाशिक : गेली दोन वर्ष नागरिकांना विशेषत: तरुणाईस कोरोना प्रादुर्भावामुळे आलेल्या निर्बंधांमुळे नवीन वर्षाचा आनंद साजरा करता आला नाही.

यंदा निर्बंधमुक्त ३१ डिसेंबर अर्थात्‌ नवीन वर्ष सोहळा उत्साहात साजरा करावयास मिळणार आहे. त्यामुळे अबालवृद्धांमध्ये अमाप उत्साह दिसून येत आहे. अशा पार्श्‍वभूमीवर सर्वच वयोगटातील नागरिकांचे नववर्षाच्या स्वागताचे जोरदार नियोजन सध्या सुरू आहे.

नववर्ष स्वागताच्या नियोजनात पर्यटनालाही मोठे महत्त्व मिळत असल्याचे सर्वत्र बघावयास मिळत आहे. त्यातून शुक्रवार (ता. ३०) पासूनच नाशिकसह त्र्यंबकेश्‍वरलाही भाविक, पर्यटकांची गर्दी होत आहे. नवीन वर्षाचा उत्साह अर्थात्‌ ३१ डिसेंबर साजरा करण्यासंदर्भात सर्वांमध्ये आकर्षण असते. (New year celebration youngsters excited big crowd in trimbakeshwar Nashik News)

New Year Celebration
New Year 2023 Resolutions: मुलांना नव्या वर्षाचे संकल्प काय सुचवाल; पुर्ण करून घेण्याची सोप्पी ट्रिक!

मध्यमवर्गीय, तसेच तरुणाईमध्ये मात्र जास्त प्रमाणावर आकर्षण बघावयास मिळते. त्यातच, गेल्या दोन वर्षांत कोरोना प्रादुर्भावामुळे निर्बंध होते. त्यामुळे सलग दोन वर्ष नवीन वर्षाचे जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करता आले नाही. यंदा मात्र परिस्थिती सामान्य असल्याने निर्बंधमुक्त उत्साह साजरा करता येणार आहे. त्यामुळे तरुणाईंकडून विशेष तयारीस जोर आला आहे.

दरम्यान, शनिवारी (ता. ३१) व रविवारी (ता. १) शासकीय कार्यालयांना सुट्टी असल्याने नवीन वर्ष साजरा करणाऱ्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. शनिवारी उशिरापर्यंत जल्लोष केला तरी, रविवारी संपूर्ण दिवस आराम करावयास मिळणार आहे. काहींनी शनिवार, रविवारची सुट्टी आणि नवीन वर्षाचे औचित्य साधत पर्यटनाचे नियोजन केले आहे. यानिमित्ताने त्यांना कुटुंबीयांसह वेळ घालवता येणार आहे. दुसरीकडे, शुक्रवारपासूनच मद्याच्या दुकानांमध्येही मद्यप्रेमींची गर्दी दिसून आली.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

New Year Celebration
New Year 2023 Horoscope: या राशीच्या लोकांची नव्या वर्षात होईल भरभरून प्रगती मात्र...

दोन वर्षानंतर नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांमधील उत्साह लक्षात घेता, पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. त्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून, रात्रभर पोलीस रस्त्यावर तैनात असणार आहेत.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, याची पुरेपूर काळजी घेत चौकांत, संवेदनशील भागात नाकाबंदी, अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करणे, गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे, त्यांची तपासणी करणे याप्रमाणे नियोजन केले आहे. हॉटेल चालकांनीदेखील नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी विशेष व्यवस्था करत हॉटेलवर आकर्षक विद्युत रोषणाई करून सजवण्यात आले आहे.

पोलिसांच्या सुट्या रद्द

शनिवारी आणि रविवारी नागरिकांकडून विविध पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. त्यात नागरिकांचा उत्साह पाहता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, सर्वांना उत्साहात निर्विघ्नपणे आनंद साजरा करता यावा. यासाठी पोलीस विभागाकडून अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्टीसह अन्य प्रकारच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

New Year Celebration
New Year 2023 : नववर्ष जल्लोषावर पोलिसांचा जागता पहारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com