esakal | माता न तू वैरिणी; साडीमध्ये गुंडाळून नवजात लेकीला फेकले
sakal

बोलून बातमी शोधा

baby found in vasoli

माता न तू वैरिणी; साडीमध्ये गुंडाळून नवजात लेकीला फेकले

sakal_logo
By
विशाल मराठे

मेशी (जि.नाशिक) : आईसारखी माया कोणीही करू शकत नाही, असे म्हणतात. पण याच मायेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना वासोळ (ता. देवळा) येथे घडली. नुकत्याच जन्मलेल्या बालिकेला साडीच्या कपड्यांत गुंडाळून येथील गल्लीत असलेल्या मोडक्या झोपडीत फेकून दिल्याचा खळबळजनक प्रकार घडला. सोमवारी (ता.१४) सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. (newly-borned-baby-found-vasoli-nashik-marathi-news)

वासोळला आढळली ‘नकोशी’; ग्रामस्थांमध्ये संताप

वासोळ येथील आदिवासी वस्तीत नुकतीच जन्मलेली बालिका सापडली. बाळाचा जन्म रात्रीच्या सुमारास झाला असावा, असा अंदाज आहे. बाळाच्या रडण्यामुळे तेथील नागरिकांचे लक्ष गेल्याने बाळाचे प्राण वाचले. पोलिसपाटील कैलास खैरनार व तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना प्राथमिक माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन बालिकेला उपचारासाठी वासोळ येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात आणले. उपकेंद्राचे आरोग्यसेवक डॉ. महेश सूर्यवंशी व आरोग्यसेविका वंदना बच्छाव यांनी प्राथमिक उपचार केले. त्याच्या डाव्या पायाच्या पंजाला गंभीर दुखापत झाली असून, अधिक उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. बेवारस अवस्थेत असल्याने कुत्र्यांनी पायाला जखम केल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. देवळा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

वासोळ येथे बेवारस स्थितीत आढळलेल्या नवजात बालिकेवर उपचार केले असून, तिच्या डाव्या पायाला गंभीर इजा झाल्याने पुढील उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. - डॉ. महेश सूर्यवंशी, आरोग्यसेवक, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र, वासोळ

हेही वाचा: घरपट्टी पाठोपाठ बाजार फी वसुलीचेही खासगीकरण; प्रशासनाकडून तयारी

हेही वाचा: कोरोनामुळे नाशिक विभागातून २० हजार ५३२ कामगार स्थलांतरित

loading image
go to top