2 महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या विवाहितेची शेततळ्यात आत्महत्या

Suicide
Suicideesakal

येवला (जि. नाशिक) : किराणा दुकान टाकण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावेत या मागणीसाठी अवघ्या दोन महिन्यापूर्वी विवाह झालेल्या महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याने नवविवाहितेने शेततळ्यात आत्महत्या (Suicide) केल्याची घटना देवठाण येथे घडली आहे. याप्रकरणी पती, सासरा, सासू, दिर या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. चार जणांना अटक कऱण्यात आली आहे.

माहेरून लाख रुपये आणावे यासाठी तिचा छळ

तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निशा योगेश गायकवाड (२१) या तरुणीचा देवठाण शिवारातील शेततळ्यातील पाण्यात मृतदेह आढळून आला होता. तिचे वडील प्रभाकर त्रिभुवन (रा. चोरवाघलगाव, ता. वैजापूर) यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार निशाचा विवाह २२ फेब्रुवारीला देवठाण शिवारात राहणाऱ्या योगेश गायकवाड याच्यासोबत झाला होता. एक महिन्यातच निशाला माहेरून किराणा दुकानासाठी एक लाख रुपये आणावे यासाठी शारीरिक व मानसिक छळ सुरू करण्यात आला होता. तिला सतत मारहाण, शिविगाळ करून त्रास दिला जात होता असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळेच निशाने आत्महत्या केली असावी असा आरोप करण्यात आला. येवला तालुका पोलिसांनी पती योगेश गायकवाड, सासरे परसराम गायकवाड, सासू भामाबाई गायकवाड, जेठ वाल्मीक गायकवाड, जेठानी पंचशिला गायकवाड आदी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून यातील चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना तीन दिवसांची (९ एप्रिलपर्यत) पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक एकनाथ भिसे तपास करत आहेत.

Suicide
चारिञ्याच्या संशयावरुन पत्नीचा निर्घृण खून करणाऱ्यास जन्मठेप
Suicide
आसारामच्या आश्रम आवारात कारमध्ये सापडला युवतीचा मृतदेह

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com