आसारामच्या आश्रम आवारात कारमध्ये सापडला युवतीचा मृतदेह

मृत आढळून आलेली मुलगी 5 एप्रिल रोजी सायंकाळपासून घरातून बेपत्ता झाली होती.
Asarambapu Ashram
Asarambapu AshramSakal

गोंडा : संत आसाराम बापू आश्रम (Asaram Bapu Ashram Premises) परिसरात उभ्या असलेल्या कारमध्ये एका युवतीचा मृतदेह आढळून आला आहे. बहराइच रस्त्यावरील विमौर गावातील आश्रम परिसरात हा मृतदेह आढळून आला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मृत आढळून आलेली मुलगी 5 एप्रिल रोजी सायंकाळपासून घरातून बेपत्ता झाली होती. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजाली आहे. याप्रकरणी संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी तीन जणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसांनी आश्रमाच्या सेवेदारासह अनेकांना ताब्यात घेतले आहे. (Teen Age Girl Dead Body Found In Ashram Ashram)

Asarambapu Ashram
कोळसा उपलब्ध झाला, तरी रेल्वे ट्रॅक उपलब्ध होत नाहीत, राऊतांचं केंद्राकडे बोट

याबाबत अधिक माहिती अशी की, बहराइच रस्त्यावरील विमौर गावात आसाराम बापूचा आश्रम आहे. त्या ठिकाणी उभ्या असलेल्या एका कारमधून बऱ्याच प्रमाणात दुर्गंधी येत होती. त्यानंतर तेथे असलेल्या पहारेकऱ्याने तपासणी केली असता. त्याला कारमध्ये मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्यांनी माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. दरम्यान, आरोपीला पकडण्यासाठी पाच पथके तैनात करण्यात आली आहेत.

Asarambapu Ashram
मुख्यमंत्र्यांच्या फोन कॉलनंतर वसंत मोरे राज ठाकरेंच्या भेटीला, म्हणाले...

पोलिसांनी सांगितले की, शहर कोतवालीमधील एका गावात राहणारी युवती 5 एप्रिल रोजी संध्याकाळी घरातून बेपत्ता झाली होती. याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी 6 एप्रिल रोजी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर संबंधित युवतीचा बराच शोध घेण्यात आला. मात्र तिचा शोध लागला नाही. त्यानंतर 7 एप्रिल रोजी मुलीच्या वडिलांनी तीन जणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांना गोंडा-बहराइच रस्त्यावरील संत आसाराम बापू आश्रम परिसरात उभ्या असलेल्या कारमध्ये मुलीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी हा मृतदेह बेपत्ता असलेल्या मुलीचा असल्याचे निष्पन्न झाले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलीस अधिक्षकांनी सांगितले आहे.

Asarambapu Ashram
पोलिसांनी 'त्या' बलात्कार पीडितेला तसं करायला शिकवलं : आसाराम बापू

कारची कोणाची अद्याप अस्पष्ट

दरम्यान, आश्रम परिसरात आढळून आलेली कार नेमकी कुणाची आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच संबंधित मुलगी गाडीच्या आत कशी आली? तसेच सेवकांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com