esakal | राहत्या घरातून अचानक नवविवाहित बेपत्ता; काय घडले त्या रात्री?

बोलून बातमी शोधा

bride

राहत्या घरातून अचानक नवविवाहित बेपत्ता; काय घडले त्या रात्री?

sakal_logo
By
गोपाळ शिंदे

घोटी (जि.नाशिक) : राहत्या घरातून पति-पत्नी जेवण करून 11 वाजता झोपले होते. पतीला पहाटे जाग आली तेंव्हा पत्नी जवळ नसल्याचे दिसून आले. आणि पतीला धक्काद बसला. काय घडले त्या रात्री???

हेही वाचा: देवेंद्र फडणवीस यांची सोशल मिडीयावर बदनामी; पाच जणांवर गुन्हा दाखल

वाळविहिर येथून नवविवाहिता बेपत्ता

वैतरणा येथील मनीषा गुडनर यांचा विवाह ( ता. 22 मार्च ) वाळविहिर येथील शिवनाथ घोगरे यांच्याशी झाला होता. ( ता. 27 ) रोजी राहत्या घरातून पतिपत्नी जेवण करून अकरा वाजता झोपले होते. पती शिवनाथ यांना पहाटे दीड वाजता जाग आली. तेंव्हा पत्नी जवळ नसल्याचे दिसून आले. याबाबत परिसरात व नातेवाईकांना विचारणा केली असता मनीषा ही आमच्याकडे अली नसल्याचे सांगण्यात आले. ती बेपत्ता झाली म्हणून घोटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. रंगाने गोरी,उंची 161 सेंटीमीटर,शरिराने मजबूत,अंगात काळ्या रंगाची साडी त्यावर पांढऱ्या रंगाच्या रेषा,गोल चेहरा बोलणे मराठी भाषा असून सदर महिला कुठे आढळल्यास अथवा सदर महिले बाबत कोणास काही माहिती असल्यास घोटी पोलीस ठाणे दूरध्वनी 02553 220544 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन तपासी अंमलदार बिपिन जगताप यांनी केले आहे. वाळविहिर ( ता. इगतपुरी ) येथून मध्यरात्री नवविवाहित बेपत्ता झाल्याची तक्रार पती शिवनाथ घोगरे यांनी घोटी पोलीस ठाण्यात दिली.