esakal | देवेंद्र फडणवीस यांची सोशल मिडीयावर बदनामी; पाच जणांवर गुन्हा दाखल

बोलून बातमी शोधा

Devendra Fadanvis
देवेंद्र फडणवीस यांची सोशल मिडीयावर बदनामी; पाच जणांवर गुन्हा दाखल
sakal_logo
By
अंबादास शिंदे

नाशिक रोड : नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयातील माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा शुक्रवारी ( ता.30 ) रोजी कोरोना सेंटरची पाहणी केली. यावेळी बाधीत कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांसोबत त्यांनी सवांद साधला होता. यादरम्यान काहींनी फडणवीस यांची अर्वाच्य, शिवराळ भाषेत व्हिडिओ क्लिप तयार करून सोशल मिडीयात व्हायरल केली.

राजकीय वर्तुळात खळबळ

त्यामुळे भारतीय जनता पार्टी नाशिक रोड मंडळाचे अध्यक्ष हेमंत गायकवाड यांच्या नेवृत्वाखाली एका शिष्टमंडळाने शनिवारी (ता. 1) रोजी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी चौकशी करीत पाच संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.रतन खालकर, संकेत भोसले, प्रमोद कोहकंडे, राहुल जोशी,बंटी ठाकरे अशी संशयीतांची नावे आहेत. या संशयितांवर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नाशिक रोड भाजप मंडळाचे अध्यक्ष हेमंत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

हेही वाचा: संतापजनक प्रकार! जात पंचायतने महिलेला दिली पंचांची थुंकी चाटण्याची शिक्षा..

मारहाण करण्याची धमकी..

माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे भाजपचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांच्यासोबत नाशिकरोड येथील बिटको कोरोना सेंटरमध्ये पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी रुग्णांचा नातेवाईकांनी फडवणीस साहेब वरीत या आसा आवाज दिला त्याच वेळी फडणवीस यांची व्हिडीओ क्लिप तयार केली. अर्वाच्य, बदनामीकारक आणि शिवराळ भाषेत फडणवीस यांची व्हिडीओ क्लिप फेसबुकवर व्हायरल केली. तसेच यामध्ये मारहाण करण्याची धमकी देखील देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. नाशिक रोड पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने संशयितांचा शोध सुरू केला आहे. लवकरच संशयितांना ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे. शिष्टमंडळाने पोलिसांना पुरावे देखील दिले आहेत.

संशयितांवरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जावू शकते.
यावेळी आमदार ॲड. राहुल ढिकले, नाशिक शहराध्यक्ष गिरीश पालवे, नगरसेवक संभाजी मोरुस्कर, अंबादास पगारे, सुनील आडके, राजेश आढाव,संदीप शिरोळे,शाताराम घंटे, सौ. राजनंदिनी आहिरे, जयंत नारद, राम डोबे, राम आढाव, संतोष क्षिरसागर, बापु सातपुते,समीर काळे, ज्ञानेश्वर आढाव, गौरव विसपुते, भूषण शहाणे, हेमंत नारद, पंकज मित्रा, भूषण विसपुते, ऋषिकेश नारद, समीर काळे, पुनीत कांकरिया, यश आमेसर आदी उपस्थित होते.

हेही वाचा: एका डोसनंतर कोरोनाबाधितांचे प्रमाण ३ ते ४ टक्क्यांपर्यंत.. आरोग्य विभागापुढे आव्हान