esakal | प्रमुख चिकित्सा पद्धतीला ‘आयुष’ दुय्यम का मानते? आयुर्वेद चिकित्सक संतापले

बोलून बातमी शोधा

Ayurveda treatment methods

प्रमुख चिकित्सा पद्धतीला ‘आयुष’ दुय्यम का मानते? आयुर्वेद चिकित्सक संतापले

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : कोरोनाबाधितांच्या गृहविलगीकरणातील शुश्रुषाविषयक ‘आयुष’तर्फे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यावरून राज्यातील आयुर्वेद चिकित्सक संतापले आहेत. भारत, श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान, युरोपमधील इतर देशांत आयुर्वेद ही प्रमुख चिकित्सा पद्धती म्हणून वापरली जात असताना त्यास आयुष दुय्यम का मानते? असा प्रश्‍न वैद्यांनी उपस्थित केला आहे. एवढेच नव्हे, तर कंपन्याधार्जिणी धोरणे स्वीकारण्याऐवजी आयुर्वेदविषयक अनुभवाचा फायदा आपत्तीच्या काळात घ्यायला हवा, असेही वैद्यांनी अधोरेखित केले आहे.

वैद्य विक्रांत जाधव, वैद्य प्रवीण जोशी, वैद्य उदय कुलकर्णी, वैद्य माधुरी वडाळकर यांनी ‘आयुष’च्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने काही प्रश्‍न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, की आयुर्वेदाचे चिकित्सक हे किती कमकुवत आहेत आणि त्यांना चिकित्सेतील अगदी प्राथमिक गोष्टी जमतात व इतर जमत नाही, असे ‘आयुष’तर्फे भासवण्यात आले. म्हणजे आता ज्यांनी गेल्या दोन ते चार तप आयुर्वेदाच्या माध्यमातून असंख्य औषधांतून असंख्य रुग्ण बरे केले, त्यांना अर्थ नाही, असे सरकार ठामपणे सांगत आहे. आयुष अशा भूमिकेमुळे नैतिकदृष्ट्या आधुनिक शास्त्रातील पदवीधर आयुर्वेद पदवीधारकांना अधिकार नाही, असे म्हणायला मोकळे झालेत. आयुर्वेद सिद्धांतानुसार दोष, काळ, प्रकृती, स्थान, अवस्था, देश, बल, व्याधीजीर्णता, लक्षणे याचा विचार करायचा नाही का? हा खरा प्रश्‍न आहे.

हेही वाचा: संतापजनक प्रकार! जात पंचायतने महिलेला दिली पंचांची थुंकी चाटण्याची शिक्षा..

तीव्र लक्षणांच्या रुग्णांना दुसरीकडे का पाठवायचे?

कोरोना वाढत आहे म्हणून तीव्र लक्षणांच्या रुग्णांना दुसरीकडे पाठवावे. म्हणजेच याचा अर्थ असा होतो, की तीव्र लक्षणे आयुर्वेदाच्या माध्यमातून बरी होत नाहीत, असे आयुष मंत्रालय ठासून सांगत आहे. हे आयुर्वेदाच्या प्रमुख चिकित्सा पद्धतीचा विचार करता गैर आहे, असे सांगून वैद्य म्हणालेत, की मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी आधुनिक औषधे सुरू ठेवावीत. याचा अर्थ असा की आयुर्वेदाच्या अभ्यासक-संशोधकांना व त्यामार्गे आयुर्वेदशास्त्राला ही विपत्ती बरी करता येत नाही, त्यांनी करू नये असे आयुष मंत्रालय सांगत आहे. शिवाय लक्षणे नसणे, तापविरहित काही लक्षणे व ताप, खोकला, डोके दुखणे, गळून जाणे यावर ठराविक म्हणजे आठ ते नऊ औषधी आणि त्यातही ‘आयुष- ६४ काढा’ एवढेच सांगण्यात आले आहे. वास्तविक पाहता गेल्या १३ महिन्यांत व्यक्ती-प्रकृतीप्रमाणे ८० हून अधिक औषधे यशस्वीरीत्या वापरली जात आहेत. त्यात सुवर्णकल्पांचा वापर करून मोठ्या प्रमणात यश मिळत आहे. त्यामुळे ‘आयुष’ला सुवर्णकल्पांचा अभ्यास नाही का? ती आयुर्वेदातील जलद गतीने कार्य करणारी, रुग्णाला कमी वेळात उत्तम ठरणारी सिद्ध झाली आहेत. आधुनिक शास्त्रातील औषधांप्रमाणे सुवर्ण कल्पांचा दोन वेळा साठा संपला. ते शोधून रुग्णाला घ्यावे लागले हे चित्र होते.

हेही वाचा: कोरोना काळात 'या' कंपनीत मात्र घसघशीत पगारवाढ!

आयुर्वेदामुळे एकही रुग्ण नाही दगावला

आयुष मंत्रालयाने आताच्या परिस्थितीत आयुर्वेद, होमिओपॅथी अशी कितीतरी उत्तम उदाहरणांची माहिती संकलित करून त्या समाजापुढे ठेवणे गरजेचे आहे. आयुर्वेदामुळे एकही रुग्ण दगावलेला नाही. ‘आयुष’ने हे काम जगापुढे ठेवावे, अशीही अपेक्षा ‘आयुष’च्या मार्गदर्शक सूचनांविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणाऱ्या राज्यातील वैद्यांनी व्यक्त केली आहे.