esakal | कोरोना काळात 'या' कंपनीत मात्र घसघशीत पगारवाढ! कामगारदिनानिमित्त कामगारांना गिफ्ट

बोलून बातमी शोधा

money
कोरोना काळात 'या' कंपनीत मात्र घसघशीत पगारवाढ!
sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (जि.नाशिक) : कोरोनाच्या संकटकालीन परिस्थितीमध्ये एकीकडे कामगारवर्गाला दोन वेळच्या जेवणाचे पडलेले असताना दुसरीकडे सिन्नरमधील एका कंपनीने कामागार दिनाच्या पार्श्‍वभूमीवर कामगारांना घसघशीत पगारवाढ, बोनस, मेडिक्लेम पॉलिसी, पेट्रोल अलाउन्स, फरक व रजावाढ असे बरेच काही दिले. कामगारदिनाच्या आदल्या दिवशी गिफ्ट मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

कंपनी कामगारांना मिळणार घसघशीत पगारवाढ

शुक्रवारी (ता. ३०) सिन्नर येथील मे. बेलोटा अॅग्रिसोल्युशन्स ॲन्ड टूल्स कंपनी व्यवस्थापन व नाशिक वर्कर्स युनियन सीटू संलग्नचे अध्यक्ष व राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्यात सकारात्मक चर्चा होऊन पगारवाढीच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. कराराप्रमाणे कामगारांना आठ हजार ४०० रुपये सरळ पगारात वाढ होणार. राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार वेळोवेळी महागाई भत्तावाढ मिळणार आहे. दरमहा ७८० रुपये पेट्रोल अलाउन्स वाढ, तसेच दर वर्षी दोन लाखांची मेडिक्लेम पॉलिसी लागू होणार आहे. दर वर्षी बोनस पूर्ण पगार देण्यात येईल.

हेही वाचा: नाशिक शहरात लसीकरण मोहिमेला पुन्हा ब्रेक!

१ जुलैपासून लागू

ही पगारवाढ १ जुलैपासून लागू होणार आहे. मागच्या फरकासह, तसेच अनेक लाभ या कामगारांना मिळतील. करारावर सह्या करतेवेळी सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, कंपनीचे डायरेक्टर प्रशांत जोशी व युनियनचे उपाध्यक्ष तुकाराम सोनजे, चिटणीस अरविंद शहापुरे, गौतम कोंगळे, कमिटी मेंबर्स अजित लोखंडे, योगेश गायकवाड, चंदर शितोळे, भारत गोलसर, प्रवीण रानडे, सागर रजनोर, तुकाराम कडाभाने आदी उपस्थित होते.

हेही वाचा: मामाने केला विश्वासघात! शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन भाचीचे परस्पर लावले लग्न