esakal | शिवसेनेच्या उपनेतेपदी सुनील बागूल यांना बढती मिळणार
sakal

बोलून बातमी शोधा

Sunil Bagul

संघटनात्मक बदल करताना महानगरप्रमुखपदी आक्रमक चेहरा म्हणून सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती केली. त्यानंतर शिवसेनेची मूळ ताकद असलेल्या वसंत गिते व सुनील बागूल यांना भाजपतून पुन्हा शिवसेनेत प्रवेश देऊन संघटनात्मक पातळीवर पक्ष मजबूत केला.

शिवसेनेच्या उपनेतेपदी सुनील बागूल यांना बढती मिळणार

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : राष्ट्रवादी (NCP), भाजप (BJP) व आता पुन्हा मूळ घरी म्हणजे शिवसेनेत (Shvsena) प्रवेश करूनही अपेक्षित पद पदरी न पडल्याने व महापालिका निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या समितीमध्ये स्थान न दिल्याने काहीसे नाराज असलेल्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुनील बागूल (Suni Bagul) यांना बढती देऊन उपनेतेपदी नियुक्ती केली जाण्याची दाट शक्यता आहे. (News about nashik municipal election and internal politics)


आगामी महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Election) शिवसेनेने कंबर कसली आहे. संघटनात्मक बदल करताना महानगरप्रमुखपदी आक्रमक चेहरा म्हणून सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती केली. त्यानंतर शिवसेनेची मूळ ताकद असलेल्या वसंत गिते व सुनील बागूल यांना भाजपतून पुन्हा शिवसेनेत प्रवेश देऊन संघटनात्मक पातळीवर पक्ष मजबूत केला. जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना विधान परिषदेवर स्वीकृत आमदार म्हणून संधी दिली. निवडणूक तयारीचा भाग म्हणून नऊ महिने अगोदरच समिती गठित केली. समितीमध्ये जिल्हाप्रमुख करंजकर यांच्यासह ज्येष्ठ नेते वसंत गिते, दत्ता गायकवाड, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती केली. बागूल यांचे शहरातील श्रमिक सेनेच्या माध्यमातून संघटनात्मक ताकद लक्षात घेता निवडणूक समितीमध्ये त्यांना स्थान मिळाले पाहिजे होते, अशी भावना त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली. यामुळे बागूल काही नाराज असल्याचे स्पष्ट झाले. गेल्या सात-आठ महिन्यांपासून पक्षात प्रवेश देऊनही महत्त्वाची जबाबदारी न दिल्याने बागूल यांची कोंडी तर केली जात नाही ना, अशीदेखील शंका व्यक्त करण्यात आली. या सर्व बाबींचा सारासार विचार करता पक्ष नेतृत्वाकडून दखल घेत त्यांना उपनेतेपद दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: नाशिक लॉकडाऊन शिथिल : बाजार समित्या, औद्योगिक क्षेत्राला दिलासा

घोलप यांच्या पदावर टांगती तलवार
नाशिक जिल्ह्यात माजी मंत्री बबन घोलप यांच्याकडे उपनेते पदाची जबाबदारी आहे. घोलप स्वतः सहा वेळा आमदार, त्यात एकदा मंत्री, मुलगी नयना महापौर, तर मुलगा योगेश यांच्याकडे एकदा आमदारकी एवढी पदे मिळूनही संघटनेसाठी त्यांचा फारसा उपयोग झाला नाही. त्यात देवळाली विधानसभा मतदारसंघ या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात योगेश यांचा पराभव झाल्याची खंत शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींना आहे. या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेता घोलप यांच्याऐवजी सुनील बागूल यांना उपनेतेपदावर संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
(News about nashik municipal election and internal politics)

हेही वाचा: कोरोनामुळे मृत्यूचा नाशिक जिल्ह्यात पुन्हा विस्फोट!

loading image
go to top