सुंदर तरूणीला बघताच तुमच्याही ह्रदयाची वाढते धडधड?...मग हे आहे कारण?

beautiful girl.jpg
beautiful girl.jpg

नाशिक : तुम्हाला कधी एखाद्या सुंदर तरूणीला पाहून भिती वाटली का? तिला पाहून तुम्ही घामाघूम होऊन तुमचा थरकाप उडतो का? जर असं होत असेल तर तुम्हाला महिलांची भिती वाटण्याचा फोबिया आहे. चला जाणून घेऊ या फोबियाबाबत...

महिलांना घाबरता तर...हा फोबिया आहे तुम्हाला... 

तर या फोबियाचं नाव म्हणजे वीन्सट्राफोबिया... म्हणजेच सुंदर महिलांची भिती वाटणे. काही जणं असेही असतात, ज्यांची सुंदर महिलांकडे बघण्याच्या किंवा त्यांच्यासोबत एकट्यात बोलण्याच्या विचाराने सुध्दा हालत खराब होते. या फोबियाला कॅलिगनीफोबिया किंवा वीन्सट्राफोबिया असे म्हणतात. या फोबियाने पीडित लोकांना सुंदर महिलांची इतकी भिती वाटते की, ते सुंदर महिलांना भेटण्याच्या किंवा बोलण्याच्या विचारासुध्दा अस्वस्थ होतात. 

ही आहेत लक्षणे?

भीतीने थरकाप उडणे
घुसमटल्यासारखे होणे
अचानक रडायला येणे किंवा ओरडणे
भावनात्मक लक्षणे
कुठेतरी दूर पळून जावं वाटणे
मनात सतत जीव देण्याचा विचार येणे
हृदयाचे ठोके वाढणे 
पाय लटपटणे
पोटात गोळा येणे,
मळमळ होणे, 
डोकेदुखी
आपला जीव गेलाय किंवा तुम्ही आंधळे झाला असं वाटणे
स्ट्रोक आल्यासारखं वाटणे
कधी कधी वेड्यासारखं वाटणे,श्वासांचा त्रास 


फोबियाबद्दल...
अनेक लोकांच्या मनात वेगवेगळ्या विचित्र भिती असतात ज्यावर कधी कधी विश्वासही बसत नाही. याला फोबिया असं म्हटलं जातं. फोबियाला सोप्या भाषेत समजून घ्यायचं तर एखाद्या गोष्टीबाबत मनात भिती असणे. काही लोकांना पाण्याची भिती असते, तर काही लोकांना उंची किंवा काही लोकांना पाल-झुरळाची भिती वाटते. या फोबियाकडे लोक फारच सामान्यपणे बघतात आणि त्याकडे दुर्लक्ष करतात. भिती मानवी स्वभावाचा एक गुण आहे. पण अनेकदा एखादी भिती सीमा पार करते आणि आपल्यावर ताबा मिळवते. हीच स्थिती पुढे फोबियाचं रूप घेते. वरील लक्षणे दिसत असतील तर वेळीच मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि काही थेरपीने तुम्ही ही समस्या दूर करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com