esakal | घरात साधी चिठ्ठी लिहून जेव्हा 'दोघी' पळून जातात तेव्हा.....
sakal

बोलून बातमी शोधा

girls escaped.jpg

या मुली घरात एक चिठ्ठी लिहून निघून गेल्याची तक्रार घेऊन पालक आले. सध्या होत असलेल्या घटनांकडे बघता घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने या दोघांनी फिर्याद नोंदवून घेतली. पण पुढे...

घरात साधी चिठ्ठी लिहून जेव्हा 'दोघी' पळून जातात तेव्हा.....

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक/ इंदिरानगर : रविवारी (ता. 23) सायंकाळी सातला पोलिस उपनिरीक्षक बाखले आणि हवालदार पवार यांच्याकडे या मुली घरात एक चिठ्ठी लिहून निघून गेल्याची तक्रार घेऊन पालक आले. सध्या होत असलेल्या घटनांकडे बघता घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने या दोघांनी फिर्याद नोंदवून घेतली. 

अशी घडली घटना...

वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक पांडुरंग पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी आणि उपायुक्त विजय खरात यांना ही माहिती दिली. हे अधिकारी तातडीने पोलिस ठाण्यात आले. पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांना कळविण्यात आले. त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार तातडीने इगतपुरी, नाशिक रोड, घोटी आदी रेल्वे आणि बसस्थानकांना माहिती देण्यात आली. त्या सर्व ठिकाणी पथके रवाना करण्यात आली. उपनिरीक्षक सतीश जगदाळे, रियाज शेख, दीपक पाटील, भगवान शिंदे यांच्याकडे तपासाची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी गुप्त बातमीदारामार्फत संबंधित वर्णनाच्या दोन मुली कालिका मंदिर परिसरात आढळून आल्याची माहिती मिळविली.

हेही वाचा > लासलगाव जळीतकांड प्रकरण : 'ती'ला दिला अखेरचा निरोप!

इंदिरानगर पोलिसांची कारवाई

तत्काळ त्या भागात जाऊन त्यांनी या दोघींना ताब्यात घेतले. रात्री नऊच्या सुमारास सर्व सोपस्कार पार पडत या मुलींना त्यांच्या पालकांकडे सुखरूप सुपूर्द करण्यात आले.घरात साधी एक चिठ्ठी लिहून निघून गेलेल्या मुली अवघ्या दोन तासांत इंदिरानगर पोलिसांनी शोधून काढत पालकांच्या स्वाधीन केल्या.

हेही वाचा > ...अन् चक्क पाच टन द्राक्षे फेकावी लागणार?...द्राक्ष हंगामापुढे पेच

go to top