नाशिक- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी राबविलेल्या मतदार नोंदणी मोहिमेमुळे जिल्ह्यात नवमतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एक जानेवारीपासून आजपर्यंत पंधराही विधानसभा मतदारसंघात ६७,६०७ नवमतदारांची नोंदणी झाली आहे. विशेष म्हणजे, या पाच महिन्यांत महिलांची नोंदणी पुरुषांपेक्षा अधिक झाली आहे.