नाशिक- बहुचर्चित व बहुप्रतिक्षित असलेली नाशिक-पुणे विमानसेवा अजूनही बंदच आहे. नाशिक-पुणे नवीन रेल्वे मार्गास होणारा विलंब व महामार्गाने होणारा पाच ते सहा तासांचा कंटाळवाणा प्रवास या दोन्ही कारणांमुळे राज्यातील महत्त्वाच्या दोन शहरांमधील संपर्क अजूनही अपूर्णच आहे.