Nashik News : हप्ता न दिल्याने गरीब वृत्तपत्र विक्रेत्याचा स्टॉल पेटविला; जेल रोड येथील घटना

 newspaper seller stall was set on fire for non payment of installments jail road nashik news
newspaper seller stall was set on fire for non payment of installments jail road nashik news esakal

Nashik News : हप्ता व वृत्तपत्र फुकट दिले नाही म्हणून तडीपार संशयिताने जेल रोड येथील कोठारी कन्या शाळेजवळ असलेल्या किशोर सोनवणे या गरीब वृत्तपत्र विक्रेत्याचा स्टॉल पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा प्रकार घडला.

संशयित गुंडास पोलिसांनी अटक केली आहे. समीर गायधनी असे संशयिताचे नाव आहे. (newspaper seller stall was set on fire for non payment of installments jail road nashik news)

वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे माजी अध्यक्ष किशोर सोनवणे यांचे जेल रोड येथील कोठारी कन्या शाळेजवळ पेपर विक्रीचा स्टॉल आहे. मंगळवारी (ता. १७) सकाळी साडेअकराच्या सुमारास सोनवणे यांचे सहकारी शरद कदम पेपर विक्रीच्या स्टॉलवर बसलेले असताना या ठिकाणी संशयित गायधनी आला.

त्याने वृत्रपत्र फुकट दे व मला हप्ता दे, अशी मागणी केली. कदम यांनी नकार देताच संतप्त झालेल्या गायधनी याने पेट्रोल टाकून संपूर्ण पेपर व स्टॉल पेटवून दिला.

 newspaper seller stall was set on fire for non payment of installments jail road nashik news
Jalgaon Gram Panchayat : 167 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू; 128 रिक्त पदांसाठी पोटनिवडणुका

या घटनेचा नाशिक रोड येथील सामान्य नागरिकांसह वृत्तपत्र सेवाभावी संघटना व पत्रकार बांधवांनी निषेध नोंदवत कडक कारवाईची मागणी केली आहे.

या घटनेत पूर्ण स्टॉल खाक झाले असून, सुमारे १५ ते २० हजार रुपयांचे नुकसान झाले. वृत्तपत्र विक्रेते किशोर सोनवणे यांचा स्टॉल जाळल्याचे समजताच वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सुनील मगर, महेश कुलथे, विजय उदावंत, वसंत घोडे, विकास रहाडे, अनिल कुलथे, दत्ता मिराणे, कुंदन शहाणे, उमेश शिंदे, बाळकृष्ण चंद्रमोरे, उल्हास कुलथे, किरण ठोसर, इब्राहिम पठाण, विजय रोकडे आदी तातडीने घटनास्थळी दाखल झाले व आरोपीला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली.

 newspaper seller stall was set on fire for non payment of installments jail road nashik news
Jalgaon News : अजित पवारांना डोळ्यासमोर ठेवून कामाला लागा : संजय पवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com