नाशिक- वयाची साठी उलटल्यानंतर अनेकांना निवृत्तीने निराशा गाठते. मात्र साठीनंतरही अनेक वृत्तपत्र विक्रेते मोठ्या उत्साहाने ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता नित्यनेमाने वृत्तपत्र वाचकांपर्यंत पोहोचवितात. सेवाभावी वृत्तीने ही सेवा संपूर्ण आयुष्यभर केल्याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव मंगळवारी (ता. ४) ‘सकाळ’तर्फे करण्यात आला. सन्मानामुळे भारावलेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचा भाव दिसून आला. औचित्य होते... ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीच्या ३६ व्या वर्धापन दिनाचे.