Success Story : आदिवासी गावातील नीलेश बनला वनपरिक्षेत्र अधिकारी; MPSCतून भरारी!

Nilesh chavan from tribal village become forest range officer
Nilesh chavan from tribal village become forest range officer esakal

Success Story Nashik : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून, यात दुडगाव (ता. नाशिक) येथील नीलेश चव्हाण याने वयाच्या २७ व्या वर्षी वनपरिक्षेत्र अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. विशेषत: तो एका वर्षात एमपीएससी परीक्षेच्या माध्यमातून दोन वेळा उत्तीर्ण झाला आहे. (Nilesh chavan from tribal village become forest range officer nashik news)

नाशिक तालुक्यातील महिरावणीजवळील एक हजार लोकसंख्या असलेल्या दुडगाव या आदिवासी बहुल गावातील शेतकरी शरद चव्हाण यांचा नीलेश मुलगा आहे. आयटी इंजिनिअरिंग केलेल्या नीलेश याने २०२१ मध्ये झालेल्या एमपीएससीच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रात ओबीसी प्रवर्गातून पाचवा क्रमांक, तर महाराष्ट्रात २५ वा क्रमांक पटकावला आहे.

त्याचा हा प्रवास तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरला आहे. दुडगाव येथील ग्रामस्थांनी नीलेश याची मिरवणूक काढत नागरी सत्कार केला. यावेळी माजी महापौर दशरथ पाटील, विलास शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी भदाणे, मुरलीधर पाटील, दिनकर आढाव, करण गायकर, विष्णुपंत म्हैसधुणे, नयना घोलप, संपत सकाळे, गोपाळराव पाटील, बाजीराव भागवत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Nilesh chavan from tribal village become forest range officer
Nashik Grapes Export : द्राक्षपंढरीतून 20 हजार टनाने अधिकची निर्यात

नीलेश याने २०२० मध्ये एमपीएससी परीक्षा दिली असता, या परीक्षेतही त्याने राज्य कर निरीक्षक (एसआयटी) या पदाला गवसणी घातली होती. २०२१ मध्ये झालेल्या एमपीएससी परीक्षेतही यश मिळवीत त्याने वनपरिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) पदाला गवसणी घातली आहे. नीलेश याने प्राथमिक शिक्षण दुडगावात, माध्यमिक शिक्षण कोपरगाव येथील जंगली महाराज आश्रमात घेतले तर, बारामती येथून बीएस्सी ॲग्री बायोटेकची पदवी घेतली आहे.

Nilesh chavan from tribal village become forest range officer
Market Committee Election : गावोगावी बैठकांना जोर, मन वळविण्याची कसरत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com