Nimani Bus Stand
sakal
पंचवटी: निमाणी बसस्थानक समस्येचे आगार बनल्याचे दिसून येत आहे. सद्यःस्थितीत मूलभूत सुविधांच्या अभावामुळे प्रवाशांची गैरसोय होते. त्यातच बससेवेबाबत माहिती मिळत नसल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ होत आहे. बसस्थानकातील ‘सिटीलिंक’चे चौकशी कक्ष अनेकदा बंद असल्याने पंचवटीत येणाऱ्या भाविक, पर्यटक, परजिल्ह्यांतील प्रवाशांना माहिती मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.