Nashik : आजपासून फक्त महिलांसाठी निमाणी- त्र्यंबकेश्वर Citylinc बससेवा

Rameez Pathan, Shadab Syed, Sanket Gaikwad etc. giving a statement to Citylink Bus Service General Manager Milind Bund.
Rameez Pathan, Shadab Syed, Sanket Gaikwad etc. giving a statement to Citylink Bus Service General Manager Milind Bund.esakal
Updated on

इंदिरानगर (जि. नाशिक) : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे निवेदनाद्वारे केलेल्या मागणीची सिटीलिंक बससेवेचे महाव्यवस्थापक मिलिंद बंड यांनी तातडीने दखल घेत निमाणी बस स्टॅन्ड ते त्र्यंबकेश्वरपर्यंत खास महिलांसाठी स्वतंत्र बस आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पाच जास्तीच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत. (Nimani Trimbakeshwar Citylinc bus service for women only from today Nashik Latest Marathi News)

नाशिक- त्र्यंबकेश्वर मार्गावर इंजिनिअरिंग आणि फार्मसी महाविद्यालये आहेत. नाशिक शहरातून या महाविद्यालयात जाणारे विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. बस फेऱ्या अपुऱ्या असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. बुधवारी (ता. २१) सकाळी साडेनऊ वाजता नाशिक रोड ते त्र्यंबकेश्वर बस सिव्हिल हॉस्पिटल समोरील थांब्यावर सुमारे अर्धा तास बस गच्च भरल्यामुळे बस चालकाला बस थांबून ठेवावी लागली.

जोपर्यंत दरवाज्यातील गर्दी कमी होत नाही, तोपर्यंत बस चालू होणार नाही अशी भूमिका बस चालकाने घेतली. वाहकदेखील पासऐवजी तिकीट असणाऱ्या प्रवाशांना प्राधान्य देतात. त्यामुळे पासधारक विद्यार्थ्यांना रस्त्यावर अडकून राहावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांचे हाल सुरू होते. ही कैफियत श्री. बंड यांच्याकडे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मांडत या मार्गावर महाविद्यालयीन वेळेत बस फेरी वाढवून विद्यार्थ्यांना सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली.

Rameez Pathan, Shadab Syed, Sanket Gaikwad etc. giving a statement to Citylink Bus Service General Manager Milind Bund.
Nashik : डॉ. श्रीवास, डॉ. सैंदाणे यांचे अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर

त्याची तत्काळ दखल घेत बंड गुरुवार (ता. २२) पासूनच सकाळी नऊ वाजता निमानी बस स्टॅन्ड येथून तर दुपारी चार वाजता त्र्यंबकेश्वर येथून खास महिला आणि युवतींसाठी स्वतंत्र बस सुरू करत असल्याचे जाहीर केले. सोबत सर्वांसाठी पाच जास्तीच्या फेऱ्यादेखील सुरू करत असल्याचे सांगितले.

तातडीने निर्णय घेतल्याबद्दल शहर उपाध्यक्ष रमीज पठाण, शदाब सय्यद, संकेत गायकवाड, रजा शेख, गणेश शेवरे, शेहबाज काजी आदींनी त्यांचे आभार मानले. मागणी तत्काळ मंजूर केली असून, गुरुवारपासून निमाणी ते त्र्यंबकेश्वरसाठी सकाळी ९ वाजता एक बस स्वतंत्र महिलांसाठी आणि ५ नवीन बस या मार्गावर सुरु करण्यात येतील, असे आदेश महाव्यवस्थापक मिलिंद बंड यांनी दिले आहे.

Rameez Pathan, Shadab Syed, Sanket Gaikwad etc. giving a statement to Citylink Bus Service General Manager Milind Bund.
नाट्यगृहाची अनुभूती मिळते घरबसल्या!; नाशिकच्या कल्पेश कुलकर्णीची अनोखी चळवळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com