नाशिक- बहुचर्चित निफाड ड्रायपोर्टला मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गाशी जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या ३.९९ हेक्टर खासगी जमिनीचे सक्तीने भूसंपादन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. महसूल प्रशासनाने यासाठी पूर्ण तयारी केली असून, सोमवारी (ता. ७ जुलै) या संदर्भातील अंतिम अवॉर्ड जाहीर करण्यात येणार आहे.