Niphad Farmer Kailas Panaghavane : हृदय पिळवटून टाकणारी घटना! निफाडमध्ये प्रगतशील शेतकरी कैलाश पानगव्हाणे यांनी द्राक्षबागेतच संपवलं जीवन

Progressive grape farmer from Niphad ends life amid severe losses : नाशिकमधील निफाड तालुक्यातील उगाव येथील प्रगतशील द्राक्ष उत्पादक शेतकरी कैलाश यादवराव पानगव्हाणे यांनी द्राक्षबागेतील सततचे नुकसान आणि कर्जबाजारीपणामुळे तणावातून आत्महत्या केली. त्यांच्या निधनाने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
Kailas Panaghavane

Kailas Panaghavane

sakal 

Updated on

निफाड: उगाव (ता. निफाड) येथील प्रगतशील शेतकरी कैलाश यादवराव पानगव्हाणे (वय ४५) यांनी द्राक्षबागेतील सततचे नुकसान आणि कर्जबाजारीपणामुळे तणावातून सोमवारी (ता. ३) सकाळी द्राक्षबागेतच विषप्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे उगाव व परिसरात शोककळा पसरली असून, एक प्रगतिशील शेतकरी गमावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com