child health
sakal
पिंपळगाव बसवंत: आईच्या कुशीत लहानग्यांचा श्वास सुरक्षित राहण्यासाठी आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. नवजात व वर्षाच्या आतील बालकांचा मृत्यू टाळण्यासाठी जाणीवपूर्वक झालेल्या प्रयत्नांमुळे निफाड तालुक्यातील अर्भक व बालमृत्यू दराचे प्रमाण घटून नवजीवनाला दिलासा मिळाला आहे.