निफाड- खेडलेझुंगे: पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही रस्त्याअभावी मृतदेह घरात ठेवावा लागतो, ही दुर्दैवी घटना शनिवारी (ता. २३) निफाड तालुक्यातील कोळगाव-देवगाव परिसरात घडली. गावातील प्रकाश दत्तात्रेय घोटेकर (वय ३९) यांचे निधन झाले, मात्र स्मशानभूमीकडे नेण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने मृतदेह रविवारी (ता. २४) दुपारी बारापर्यंत घरातच ठेवावा लागला. अखेरीस ग्रामस्थांच्या संतापाच्या पार्श्वभूमीवर ट्रॅक्टरवरून अंत्ययात्रा निघाली आणि दुपारी एकला अंत्यविधी पार पडला.