road protest
sakal
निफाड: नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पिंपळस ते विंचूरदरम्यान असलेल्या प्रचंड खड्ड्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही दखल न घेतल्याने शुक्रवारी (ता. १०) शिवसेनेच्या युवासेनेने आक्रमक पवित्रा घेतला. जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे यांच्या नेतृत्वाखाली ढोल-ताशांच्या गजरात ‘रास्ता रोको’ करण्यात आले.