Temple Thefts
sakal
चांदोरी: सिन्नर, निफाड तालुक्यांत देवस्थानांना लक्ष्य करत लुटमारीची मालिका थांबायचे नाव घेत नाही. शिवापूर, देवगाव, नैताळे, निफाड येथील मंदिरांनंतर आता सायखेडा येथील लक्ष्मीनारायण मंदिरात चोरीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. देवस्थानावर हात टाकणाऱ्या चोरट्यांबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी तातडीने या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.