निफिड/कसबे सुकेणे: निफाड साखर कारखाना एक महिन्यात जिल्हा बँक विक्री करणार असून, या विक्रीला आमचा तीव्र विरोध आहे. निसाकाची ही शेवटची लढाई आहे. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू, हा कारखाना कदापि विक्री करू दिला जाणार नाही, असा ठराव भाऊसाहेबनगर येथील कामगार आणि शेतकरी सभासदांच्या सभेत होऊन निसाकाच्या भाडेतत्त्व कालावधीतील व्यवहारांची जिल्हा बँक आणि संबंधित ठेकेदारांची चौकशी व्हावी व भाडेपट्टा कराराची पुनर्रचना करावी, अशी मागणी करण्यात आली.