काका-आण्णा ड्रायव्हींग सिटवर! २०२४ च्या रेसची आतापासूच मोर्चेबांधणी

MLA Dilip Bankar - Anil-Kadam
MLA Dilip Bankar - Anil-Kadamsakal

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : निफाडचे राजकारण सध्या दोन नेत्यांभोवती पिंगा घालतांना दिसते आहे. ते म्हणजे आमदार दिलीप बनकर व माजी आमदार अनिल कदम. सध्या निवडणुकांचा माहोल नसला तरी दोघांच्या समर्थकांमधील संघर्ष कायम पेटलेला असतो. विकासकामांचा श्रेयवाद नित्याचा बनला आहे. त्यात भर पडली आहे ती शासकीय योजनाच्या शुभांरभाच्या कार्यक्रमाच्या उपस्थितीवरून. परस्परांना नामोहरण करण्याची एकही संधी सोडताना दोघेही दिसत नाही. त्याचाच प्रत्यय निफाडच्या जनतेला आला आहे. (Niphad-politics-revolves-around-MLA-Dilip-Bankar-Anil-Kadam-nashik-political-news)

राजकीय शह-काटशह निर्णायक वळणावर

दोन दिवसांपूर्वी दोघेही इन्व्होच्या ड्रायव्हींग सिटवर बसून कार चालवितांनाचे व्हिडीओ निफाडच्या जनतेचे मोठे मनोरंजन करून गेले. २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या रेससाठी आतापासून दोघेही कसून सराव करताना दिसत आहेत. निफाडचे राजकारण वरवर शांत वाटत आहे. मात्र, येथील राजकारणात दिसतं तसं अजिबातच नसतं. आताही तसंच काहीसं सुरू आहे. गेल्या पंधरा वर्षापासून निफाडच्या राजकारणावर घट्ट पकड मिळविलेले आमदार दिलीप बनकर व अनिल कदम यांच्यातील संघर्षातील तीन अंक आतापर्यंत पाहिले. दोनदा कदमांची सरशी झाली. तर, दोन वर्षापुर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बनकर यांनी एक पराभवाची परतफेड केली. आता हा राजकीय शह-काटशह निर्णायक वळणावर आला आहे. तीन वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीसाठी आतापासूनच बनकर-कदम यांनी रणशिंग फुंकलेले दिसते.

MLA Dilip Bankar - Anil-Kadam
राज ठाकरे आश्वासक नेते; त्यांची पन्नास भाषणे ऐकणार : चंद्रकांत पाटील

निवडणूक जशी जवळ येईल, तशी नाट्यमय घटना वाढतील

गेल्या महिनाभरापासून अनेक वेगवान राजकीय घडामोडीचा सिलसिला सुरू आहे. आमदार बनकर यांनी रासाका भाडेतत्त्वावर घेऊन प्रतिस्पर्ध्याचा तिळपापड करत त्यांचे राजकीय भांडवल करण्याची संधी सोडलेली नाही. पाठोपाठ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन जोश भरला. विधानसभा तालुका अध्यक्षपदावर आमदार बनकर यांच्या निवडीचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. माजी आमदार कदम यांनीही शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावात अभियानाच्या माध्यमातून दुरावलेल्यांना जवळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विकासकामांच्या श्रेयावर दोघेही परस्परांवर कुरघोडी करताना दिसत आहे. दात्याणे येथील बाणगंगा नदीवरील पुलाचे भूमिपूजन तासाभराच्या अंतराने बनकर व कदम या दोघांनी केल्याने सर्वांची बोटे आश्‍चर्याने तोंडात गेल्याशिवाय राहिली नाही. निवडणूक जवळ येईल, तशी असे नाट्यमय घटनाक्रम अधिकच वाढत जातील.

महाविकास आघाडीच्या निमित्ताने आमदार बनकर व माजी आमदार कदम यांचे राष्ट्रवादी व शिवसेना हे दोन्ही पक्ष सत्तेत आहे. यामुळे दोघांची गोची अन्‌ शासकीय यंत्रणेची डोकेदुखी झाली आहे. शासकीय कार्यक्रमाच्या शुभारंभाला एखाद्याला नाही बोलावले तर अधिकारी-कर्मचाऱ्यांची झाडाझडती होते. खावटी साहित्य वाटपाचा कार्यक्रम हे त्याचे ताजे उदाहरण आहे.

MLA Dilip Bankar - Anil-Kadam
'घाबरु नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे', राज ठाकरेंचं पदाधिकाऱ्यास आश्वासन

सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस…

बनकर व कदम यांच्या कार्यकर्त्यामध्ये सोशल वॉर कायमच चर्चेचा मुद्दा राहिला. आपलाच नेता दमदार न्‌न पॉवरफुल यासाठी समर्थकांकडून नेहमीच पोस्ट टाकल्या जातात. नुकतीच एक पोस्ट मोठा चर्चेचा विषय ठरली आहे. दिलीपकाका अन्‌ अनिल आण्णा इनोव्हा कारच्या ड्रायव्हींग सीटवर बसून स्वत: कार चालवितानाचा हा व्हिडीओ आहे. दोघांचाही हा हटके अंदाज सोशल मिडीयावर प्रतिक्रीयांचा पाऊस पाडून गेला. २०२४ च्या रेससाठी काका-आण्णा ड्रायव्हींग अशी मार्मिक कमेंट आली आहे.

(Niphads-politics-revolves-around-MLA-Dilip-Bankar-Anil-Kadam-nashik-political-news)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com