esakal | 'घाबरु नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे', राज ठाकरेंचं पदाधिकाऱ्यास आश्वासन
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray

'घाबरु नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे', राज ठाकरेंचं पदाधिकाऱ्यास आश्वासन

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक शहर उपाध्यक्ष अक्षय खांडरे यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रभागांमध्ये शिवसेनेचे नगरसेवकाकडून त्रास होत असल्याचे पत्र राज ठाकरे हे राज ठाकरे यांना दिले होते. ठाकरे नाशिक दौऱ्यावर असून, त्यांनी त्या पत्राची दखल घेत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले. (Raj Thackeray has taken note of the letter sent by Akshay Khandre)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहे. येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन झाले असताना मनसे शहर उपाध्यक्ष तथा मनसे चित्रपट कर्मचारी सेना शहराध्यक्ष अक्षय खांडरे यांनी भेट घेतली. जनहिताचे कार्य करीत असताना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या खोट्या खटल्यांबाबत कैफियत मांडली. यावर राज ठाकरे यांनी अत्यंत शांतपणे सर्व माहिती जाणून घेत अक्षय खांडरे यांना ‘अशा शंभर केस आल्या तरी घाबरू नकोस, मी आहे तुझ्या मागे आणि लवकरच मी तुझ्या प्रभागात येऊन तुझी भेट घेणार आहे’, असे आश्वासन देत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारत ते करीत असलेल्या जनहिताच्या कार्याची प्रशंसा केली.

प्रभागात चांगले काम करत असल्याने प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या नगरसेवकाने खोट्यानाट्या तक्रारी करून अडचणी निर्माण करीत आहे. यासंदर्भात राज ठाकरे यांना पत्र लिहिले होते. सदर पत्राची ‘सकाळ’ने घेतली दखल घेतली होती. त्यानुसार ठाकरे यांनी दखल घेऊन लढण्याची प्रेरणा दिली. त्यामुळे कार्य असेच सुरू ठेवणार आहे.
- अक्षय खांडरे , शहर उपाध्यक्ष, मनसे, नाशिक

(Raj Thackeray has taken note of the letter sent by Akshay Khandre)

हेही वाचा: मतदारांना पर्याय नकोचं; एक प्रभाग पध्दतच योग्य : राज ठाकरे

loading image