निफाड- शहरातील अनेक व्हॉट्सॲप ग्रुप्सवर सध्या गंभीर आणि धक्कादायक प्रकार घडत आहेत. नागरिकांच्या मोबाईलमध्ये व्हायरस घुसल्यामुळे त्यांच्या नावाने अश्लील फोटो, व्हिडिओ, मेसेज आणि ऑडिओ क्लिप्स मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड केल्या जात आहेत. यामुळे संपूर्ण निफाडमध्ये खळबळ उडाली आहे.