Income Certificate : या योजनांसाठी 5 वर्षातून एकदाच लागणार उत्पन्न दाखला

niradhar yojana Retirement Scheme Income certificate will be required only once in 5 years nashik news
niradhar yojana Retirement Scheme Income certificate will be required only once in 5 years nashik newssakal

Income Certificate : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांकडून दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल ते जून या कालवधीत उत्पन्नाचा दाखला घेण्याची तरतूद रद्द करून ५० वर्षावरील ज्येष्ठ, वृद्ध नागरिकांना सामाजिक न्याय विभागाने दिलासा दिला आहे. (niradhar yojana Retirement Scheme Income certificate will be required only once in 5 years nashik news)

ज्या लाभार्थ्यांचे वय ५० पेक्षा अधिक आहे त्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर न करता पाच वर्षातून एकदाच दाखला घेण्याबाबत शासनाने निर्णय काढला आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतः या चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी ३५ वर्षावरील अविवाहित स्त्री, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

niradhar yojana Retirement Scheme Income certificate will be required only once in 5 years nashik news
Employment fair : ‘शासन आपल्‍या दारी’अंतर्गत शनिवारी रोजगार मेळावा; सहभागासाठी या संकेतस्थळावर करा नोंदणी

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून दारिद्र्य रेषेखालील यादीच्या कुटुंबात नाव असलेल्या २१ हजार किंवा त्या पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या पात्र लाभार्थ्यास अर्थसाहाय्य देण्यात येते.

"संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या योजनेंतर्गत ५० वर्षावरील लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्न दाखला मिळवताना अडचणी येत असल्याने ज्यांचे वय ५० पेक्षा अधिक आहे, अशा लाभार्थ्यांना ५ वर्षांमध्ये एकदाच उत्पनाचा दाखला द्यावा लागणार आहे." - सुमंत भांगे, सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग.

niradhar yojana Retirement Scheme Income certificate will be required only once in 5 years nashik news
Nashik News : शासकीय कार्यालयांची सुरक्षितता धोक्यात; गस्ती पथकांची नियुक्ती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com