Nashik News : अखेर निसाकाचा भोंगा वाजला

Nisaka News
Nisaka Newsesakal

कसबे सुकेणे : मागील बारा वर्षांपासून निसाकाचा बंद असलेला भोंगा अखेर वाजला असून आता निसाका सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते.

कित्येक दिवसांनी भोंग्याचा आवाज ऐकावयास मिळाल्याने निसाका कर्मचाऱ्यांसह शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या भोग्यांच्या आवाजासह कारखान्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरवात झाली आहे. (Nisaka is about to begin so there is joy on faces of farmers Nashik News)

Nisaka News
Gram Panchayat Result : शेवटी शिंदे गटाच्या खासदारानं मुलाच्या पराभवाचा वचपा काढलाच; ठाकरे गटाला चारली धूळ!

निसाका कारखाना हा भाडेतत्वावर चालविण्यास देण्याची निविदा प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली होती. कडलग कन्स्ट्रक्शन कंपनीने कायदेशीर सर्व बाबींची पूर्तता केली असल्याने जिल्हा बँक प्रशासन आणि कडलक कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्यात पंचवीस वर्षांसाठी भाडे करारनामा झाला.

जिल्हा बँकेकडून कारखाना कडलग कंपनीकडे हस्तांतरित झाल्यानंतर कंपनीकडून कारखान्याच्या दुरुस्तीचे कामकाजही सुरु झाले आहे. निसाका सुरू व्हावा यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. त्यासाठी लोकप्रतिनिधींनीही प्रयत्न केले. ज्या ज्या व्यक्तींच्या सहकार्यामुळे निसाकाची चिमणी पेटत आहे.

त्या सर्वांना कामगार व शेतकरी वर्गाकडून धन्यवाद व शुभेच्छा दिल्या जात आहे. कोणत्या का मार्गाने होईना अखेर निसाका सुरू होत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मोठे समाधानाचे वातावरण दिसत आहे. निसाका कारखान्यामधील यंत्रसामग्रीच्या दुरुस्तीचे काम वेळेवर पूर्ण झाल्यास मे महिन्याच्या आत पहिले गाळप घेण्याचा मानस कडलग कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रशासनाचा आहे.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

Nisaka News
Nashik News : जिल्ह्यात 103 पशुपालकांना 27 लाखांचे अनुदान प्राप्त

गावातील व्हॉट्सअप ग्रुप वर आवाज व्हारलय

तब्बल दहा वर्षानंतर निफाड सहकारी साखर कारखान्यात दुरुस्तीचे काम सुरु झाले. यावेळी कारखान्याच्या गेटवर बसविण्‌यात आलेला भोंगा वाजविण्यात आला. भोंगा वाजताच कसबे सुकेणे व पंचक्रोशीतील युवकांसह शेतकऱ्यांनी आपापल्या व्हाट्सअप ग्रुपवर व स्वतःच्या स्टेटस वर निसाकाचा भोंग्याचा आवाज कैद करत तो सर्वत्र व्हायरल केला.

"बारा वर्षांपासून निसाका बंद असल्याने भोंग्याचा आवाजही बंद झाला होता. आता निसाका पुन्हा सुरू होत असल्याने ज्यांचे ज्यांचे प्रयत्न या कामासाठी आले त्या सर्वांना मनापासून धन्यवाद. कामगार व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर त्यामुळे समाधानाचे वातावरण असून आता प्रत्यक्ष निसाकाची चाके लवकर सुरू व्हावी हीच अपेक्षा."

-डी.बी.मोगल, माजी संचालक निसाका

Nisaka News
Nashik News : विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आता आदर्श शाळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com