Nitesh Rane : पोलिसांच्या चौकशीतून सत्य येईल बाहेर : नितेश राणे

त्र्यंबकेश्‍वरमध्ये उईकेंच्या समवेत महाआरती
nitesh rane
nitesh raneesakal

Nitesh Rane : राज्यात भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार असताना संशयितांना अटक होण्यास विलंब का होतोय, या पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना आज (ता.२०) येथे आमदार नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या एसआयटी चौकशीतून सत्य बाहेर येईल, असे स्पष्ट केले.

श्री. राणे आणि माजी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी येथील ज्योतिर्लिंग मंदिराच्या उत्तर महाद्वारालगत महाआरती केली. त्यानंतर श्री. राणे पत्रकारांशी बोलत होते. (Nitesh Rane statement over trimbakeshwar controversy nashik news)

ज्योतिर्लिंग मंदिरात एका गटाच्या तरुणांनी प्रवेशासाठी केलेला प्रयत्न निषेधार्ह्य आहे, असे सांगून श्री. राणे म्हणाले, की इथल्या सर्वांना कोणत्याही धर्मियांपासून त्रास होऊ देणार नाही. तसेच आम्ही वाद वाढवण्यासाठी आलो नाही, तर इथल्या लोकांनी बोलावल्याने आलो आहोत.

साधू-महंत आणि विश्‍वस्त सर्व घडामोडीबाबत सर्वांना खरी घटनेची माहिती देतील. त्याचबरोबर हिंदू धर्मातील पवित्र त्र्यंबकराजा नगरीतील शांतता अबाधित असताना कोणाच्याही सांगण्यावरून ती बिघडवणे आणि दुसऱ्या धर्मियांच्या भावना दुखावणाऱ्यांना आता माफी नसेल. मंदिरात मंदिर बंद होण्याचा कालावधीत प्रवेशासाठी बळजबरी करणे व कोणतीही प्रथा अथवा परंपरा नसताना कल्पित गोष्टी जोडून त्यावर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजेच त्यांची प्रवृत्ती दिसून येते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

nitesh rane
Sushma Andhare यांनी Uday Samant, Nitesh Rane यांच्या टिकेवर दिलं थेट उत्तर | BEED | Shivsena | BJP

शिवाय हिंदू धर्मीय लोक सोशिक असल्याने ते कुठेही आतेताईकपणा करणार नाहीत. हिंदू धर्मातील प्रथा व पूजा मान्य असतील, तर धर्म नियमानुसार दर्शन अथवा पूजा करता येईल, असे सांगत श्री. राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली.

श्री. उईके म्हणाले, की महादेव हा आदिवासी बांधवांचा देव असून हिंदू महादेव कोळी असे त्यांना संबोधतात. त्यांच्या अज्ञान व गरिबीचा फायदा अन्य लोकांनी घेऊन धर्मांतर केले जात असल्यास त्याला पायबंद बसवला जाईल. आदिवासींच्या विषयी चुकीची माहिती जाऊ नये आणि आपल्या धर्मीयांची बदनामी करणे चुकीचे आहे.

nitesh rane
Nitesh Rane on Sanjay Raut : "सामनातील अग्रलेख राष्ट्रवादीला फोडण्यासाठी "राणेंचा पलटवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com