NMC
NMCesakal

स्‍वच्‍छतेतील हलगर्जीपणामुळे ठेकेदाराला बजावली नोटीस

नाशिक : नेहमीच भाविकांची वर्दळ असलेल्‍या रामकुंड परिसरासह शहरातील विविध ठिकाणी स्‍वच्‍छतेत हलगर्जीपणा केल्‍याप्रकरणी ठेकेदाराला नोटीस बजावली आहे. महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त अशोक अत्राम यांनी ही नोटीस बजावताना खुलासा मागविला आहे.

NMC
Nashik : ‘स्मार्ट’ ठिकाणी साचले पावसाचे पाणी

शहर स्‍वच्‍छतेकरीता कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी असताना आउट सोर्सिंगद्वारे अतिरिक्‍त कर्मचाऱ्यांमार्फत स्‍वच्‍छता करण्यात येत आहे. असे असतानादेखील रामकुंड परिसर, तसेच शहरातील अन्‍य काही भागांमध्ये स्‍वच्‍छतेबाबत तक्रारी प्राप्त होत असल्‍याने महापालिका आयुक्‍त रमेश पवार यांच्‍यासह अन्‍य अधिकाऱ्यांनी विविध भागांना भेटी दिल्‍या होत्‍या. या दौऱ्यात रामकुंड परिसरात स्‍वच्‍छतेबाबत गंभीर त्रुटी दिसून आल्‍याचे बोलले जाते आहे.

याशिवाय प्रमोद महाजन उद्यान परीसरातील अस्‍वच्‍छता आढळली. तसेच, विविध ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या उपस्‍थितीसंदर्भात साशंकता निर्माण झाल्‍याने ठेकेदाराला नोटीस बजावली आहे. गैरहजेरीबाबत तीन कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. उपायुक्‍त डॉ. दिलीप मेणकर यांनी नाशिक रोड परिसराला भेट देत पाहणी केली होती. या पाहणीत तीन कर्मचारी गैरहजर असल्‍याचे निदर्शनात आल्‍यानंतर त्‍यांना नोटीस बजावली आहे. येत्‍या सात दिवसांत खुलासा करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.

NMC
Nashik : महापालिकेचा खासदार पुत्रास दणका; ठोठावला 4 लाखाचा दंड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com