नाशिक: जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर पाकिस्तानच्या अतिरेकी कारवायांना उत्तर देण्यासाठी भारताकडून हवाई हल्ले करण्यात आले. त्यापूर्वी शहरात मॉकड्रील घेतले. परंतु त्या वेळी शहरात भोंगे नसल्याची बाब जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधोरेखित करण्यात आल्यानंतर आता महापालिकेकडून शहरात बारा ठिकाणी भोंगे बसविले जाणार आहे. या माध्यमातून हवाई हल्ल्याचा इशारा दिला जाणार आहे.