NMC Computer Repair Program : संगणकीय यंत्रणा देखभाल, दुरुस्तीसाठी तज्ञ संस्था नियुक्त

NMC News
NMC Newsesakal

नाशिक : गेल्या महिन्यात महापालिकेचे संकेतस्थळावर हॅकर्सकडून व्हायरस सोडल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका मुख्यालयासह विभागीय कार्यालये, रुग्णालयांमधील संगणकीय यंत्रणेची दुरुस्ती करण्याबरोबरच कायमस्वरूपी देखभाल व दुरुस्तीसाठी तज्ञ संस्था नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (NMC Appointed expert organization for computer system maintenance repair Nashik News)

राज्य शासनाने ई- प्रशासन धोरण संमत केले आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजात अधिकाधिक माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले. ज्याद्वारे नागरिकांना विविध सेवा प्रभावी, पारदर्शक व जलदगतीने देता येतील. त्या अनुषंगाने नाशिक महापालिकेने सर्वच विभागांचे संगणकीकरण केले आहे.

माहिती व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुख्यालय, विविध विभागीय कार्यालये व उपकार्यालयाच्या ठिकाणी पर्याप्त संगणकीय साहित्य पुरवून महापालिकेचे दैनंदिन घर- पाणीपट्टी कर संकलन, तसेच जन्म- मृत्यू नोंदणी व इतर तदअनुषंगिक सेवा पुरविणे, तसेच विविध दाखले प्रमाणपत्रे वितरणाचे कामकाज केले जाते. संगणकीय साहित्य सुस्थितीत ठेवून संगणकीकरणाच्या माध्यमातून विभागीय कार्यालये व उपकार्यालये येथील कर संकलन तसेच दैनंदिन कार्यालयीन कामकाज विनाव्यत्यय सुरू ठेवण्याकरिता संगणकीय साहित्याची नियमित देखभाल दुरुस्ती करणे आवश्‍यक आहे.

NMC News
Nashik | रामकुंड नव्हे रामतीर्थ!; ‘नमामि गोदा’ प्रकल्प रेंगाळतोय कागदावरच

त्याच प्रमाणे मुख्यालयस्थित माहिती व तंत्रज्ञान विभागातील सेंट्रलाईज डाटा सेंटरमधील ई.आर.पी. कार्यप्रणाली, क्विक हिल अॅन्टी कायरस सॉफ्टवेअर सोल्यूशन्स इत्यादी महत्त्वाच्या कार्यप्रणाली कार्यरत आहे. चोवीस तास यंत्रणा कार्यान्वित ठेवणे गरजेचे असल्याने सर्व्हर्स यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीसाठी तज्ञ संस्थेची नियुक्त करण्यास आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत मान्यता देण्यात आली. ई-निविदा प्रकिया यापूर्वी राबविण्यात आली होती. परंतु ऑगष्ट महिन्यात मुदत संपुष्टात आली.

मनपाची संगणकीय मालमत्ता

एकूण सर्व्हर १९, डेस्कटॉप ८८५, ऑल इन वन डेस्कटॉप १०, कलर प्रिंटर्स ४३३, ६३२ लेजर्स प्रिंटर्स, लाईन प्रिंटर्स ११, शार्प प्रिंटर्स ११, ५८३ यूपीएस, नऊ लॅपटॉप, ९८ स्कॅनर,१७६ टॅब.

NMC News
LPG Rates Hike : ग्रामीण भागात गॅसधारक पुन्हा चुलीकडे!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com