Latest Marathi News | रस्ता NMCचा, वसुली मात्र दुकानदारांकडून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Traffic congestion due to encroachment in Dhumal Point to Dahiful area

Nashik : रस्ता NMCचा, वसुली मात्र दुकानदारांकडून

जुने नाशिक : रस्ता महापालिकेचा, वसुली मात्र दुकानदारांकडून केली जात असल्याचा अजब प्रकार मेनरोड धुमाळ पॉइंट परिसर बाजारपेठेत घडत आहे. यामुळे महापालिकेचे तर नुकसान होतच आहे. शिवाय अतिक्रमणातदेखील वाढले आहे.

अशा प्रकारात महापालिकेकडून आळा घालण्यात यावा, अशी मागणी नागरिक तसेच सजग व्यावसायिकांकडून केली जात आहे.
मेनरोड, रविवार कारंजापर्यंत, धुमाळ पॉइंट ते नेहरू चौक मुख्य बाजारपेठ आहे. (NMC build road occupied by shopkeepers increased in encroachments at old Nashik Latest Marathi News)

महापालिकेकडून या भागात उत्कृष्ट रस्ते तयार केले आहे. याच भागांमध्ये सध्या स्मार्ट रोडचे कामदेखील करण्यात आले. नागरिकांच्या सोयीसाठी हे रस्ते तयार करण्यात आले आहे. परंतु काही व्यावसायिकांकडून मात्र स्वतःच्या फायद्यासाठी त्या रस्त्यांचा वापर करून घेतला जात आहे.

रस्त्याला लागून असलेल्या दुकानदारांकडून त्यांच्या दुकानासमोर असलेल्या रस्त्यावर फेरीवाल्यांना व्यवसाय करण्याची परवानगी दिली जात आहे. त्या मोबदल्यात त्यांच्याकडून शंभर ते तीनशे रुपये दैनंदिन आकारले जातात. त्यामुळे अतिक्रमणात मोठी भर पडत आहे. रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांकडून हातात फेरीवाल्यांकडून त्या दुकानदारांना पैसे देऊन रस्त्यावर आपले दुकान थाटले जाते.

खरेदीसाठी आलेल्या नागरिकांकडून त्या व्यवसायिकांच्या दुकानावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्याच्या हातगाडी रस्त्यावर थाटलेले दुकाने आणि नागरिकांची त्यांच्या दुकानावर खरेदीसाठी होणारी गर्दी यामुळे या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दैनंदिन वाढत आहे.

इतकेच नव्हे तर रस्त्यांवरील त्या व्यावसायिकांकडून दुकानदारांना महिन्याकाठी चांगली रक्कम दिली जात असल्याने अनधिकृत वसुलीला वाव मिळत आहे. त्यात काही दुकानदारांना चांगला फायदा होत आहे. महापालिकेचे मात्र नुकसान होत आहे.

हेही वाचा: Dhule News : राज्यात 4 हजारावर Hemophilia रुग्णांच्या जिवाशी खेळ!

शिवाय वाढलेल्या अतिक्रमणामुळे नागरिक आणि परिसरातील अन्य व्यवसायिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेकडून अशा प्रकारचे अतिक्रमण हटवून अनधिकृत वसुलीवर लगाम लावण्यात यावा, अशी मागणी होत आहे. गांभीर्य ओळखून महापालिकेने लवकरात लवकर कारवाई करणे गरजेचे झाले आहे.

वाहतूक कोंडीला वाव

मोठ्या दुकानदारांकडून त्यांच्या दुकानासमोर फेरीवाल्या व्यवसायिकांना काही रक्कम घेऊन त्यांचे हातगाडे लावण्याचे परवानगी दिली जाते. त्यामुळे प्रचंड रस्ता व्यापला जातो. बाजारपेठ असल्याने नागरिकांची ये-जा असते. अशा वेळेस तेथून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांना गर्दीतून मार्ग काढावा लागतो. त्यामुळे बऱ्याच वेळेस वाहतुकीची समस्या तर निर्माण होतेच. शिवाय अपघात घडण्याच्या घटना देखील घडत असतात.

हेही वाचा: SAKAL Impact News : अभोणा- नांदुरी रस्त्याला 2 कोटींचा निधी

Web Title: Nmc Build Road Occupied By Shopkeepers Increased In Encroachments At Old Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..