SAKAL Impact News : अभोणा- नांदुरी रस्त्याला 2 कोटींचा निधी | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Temporary repair work is in progress by adding mud and gravel.

SAKAL Impact News : अभोणा- नांदुरी रस्त्याला 2 कोटींचा निधी

अभोणा (जि. नाशिक) : पावसाने निकृष्ट कामांचा ‘पर्दाफाश’ या मथळ्याखाली दैनिक ‘सकाळ’ने मंगळवारी (ता. १३) वृत्त प्रसिद्ध केले. सोशल मीडियावरही हे वृत्त व्हायरल होऊन नागरिकांनी प्रतिसाद दिला.

संबंधित विभागाने या वृत्ताची दखल घेत अभोणा- नांदुरी रस्त्याच्या कामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, वर्क ऑर्डरही निघाल्याचे सांगितले आहे. (SAKAL Impact News Abhona Nanduri Road 2 Crore Fund sanctioned nashik Latest Marathi News)

नवरात्रोत्सवाच्या आधीच कामाला सुरवात होईल. पावसामुळेच डांबरीकरणाचे काम करता येत नाही म्हणून सदर काम थांबले आहे. मात्र, दोन्ही रस्त्यांवर जे प्रचंड खड्डे पडले आहेत ते तत्काळ खडी, मुरूम टाकून बुजविण्याचे काम सुरू केले आहे. यामुळे तात्पुरत्या स्वरूपात वाहनचालकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

रस्त्याच्या मंजूर कामात नांदुरी ते अभोणा येथील गोसराणे पुलापर्यंत डांबरीकरणाचे काम लगेच सुरू होणार आहे. ‘सकाळ’ने खराब रस्त्यांचे वास्तव समोर आणल्यामुळेच रस्त्याच्या कामाला गती मिळाली. त्याबद्दल सोशल मीडियावर तसेच, स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी अभिनंदन केले आहे.